आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये नाल्यावरील रस्ता खचून २० फूट खड्डा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिडकोतील त्रिमूर्ती चौक, पाटीलनगर येथे जलशुद्धीकरण केंद्राजवळच्या नाल्यावरील रस्ता मंगळवारी सायंकाळी खचू लागला. त्यानंतर मोठा खड्डा पडल्याने येथे नागरिकांची गर्दी झाली. रस्त्याखालून जाणारा बंदिस्त नाला जुना झाल्याने हा रस्ता खचल्याचा अंदाज आहे. पालिकेचे अधिकारी आर. आर. गोसावी प्रकाश पठाडे यांनी दुरुस्तीचे काम सुरू केले बॅरिकेड्स लावले.