आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Buried Opponants Of Maratha Reservation, Vinayak Mete Appeal

मराठा आरक्षण विरोधकांना निवडणुकीत गाडा,विनायक मेटे यांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याची भूमिका शासनानेच नेमलेल्या बापट समितीने मांडली असतानाही या समाजाला ते मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे. आरक्षणाला विरोध करणा-या सर्वच नेत्यांना आणि पक्षांना आगामी निवडणुकीत गाडून टाका’, असे आवाहन शिवसंग्रामचे संस्थापक व राष्‍ट्रवादीचे आमदार विनायक मेटे यांनी रविवारी केले.
शिवसंग्रामच्या मराठा आरक्षण इशारा मेळाव्यात ते बोलत होते. मेटे म्हणाले की, ‘आरक्षणाच्या विरोधात आपल्याच समाजातील नेते असल्याने इतरांचे फावते. अन्यथा या बाजार बुनग्यांची काय मजाल की मराठ्यांना विरोध करू शकतील? आम्हाला कोणाच्याही हिश्शातून आरक्षण नको असताना ज्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही अशा गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळांनी स्वत:च यात तोंड खुपसलं आहे. ओबीसींमधून आरक्षण घेण्याची भाषा करू नका, असा आम्हालाच दम देतात. मात्र आम्ही कुणालाही घाबरत नाही,’ असे आव्हानही त्यांनी दिले.
‘मराठ्यांना झुंजार बाण्याचा इतिहास आहे. इतिहासात आमच्या पूर्वजांनी केलेली चूक पुन्हा करणार नाही, असे सांगत जाट आरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष यशपाल मलिक यांनी मराठा आरक्षणास सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
मराठा खासदारच निवडून द्या
लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून केवळ मराठा उमेदवाराला म्हणून निवडून द्या. त्यासाठी 17 ठिकाणी उभ्या राहणा-या मराठा उमेदवारांना मतदान न करता आरक्षणास समर्थन देणा-या उमेदवारालाच दिल्लीत पाठवा. ओबीसीत स्वतंत्र 25 टक्के आरक्षण देण्याचे त्याच्याकडून आश्वासन घेण्याचा सल्लाही मेटे यांनी नाशिककरांना दिला.
मंत्रालयावर 24 ला मोर्चा
आरक्षणासाठी 24 फेब्रुवारीपासून मंत्रालयावर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मेटे यांनी दिला. आरक्षण मिळेपर्यंत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कुठल्याही कार्यक्रमास जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.