आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात साकारणार बर्न्‍स हॉस्पिटल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जळीत रुग्णांवर उपचारांकरिता सुसज्ज रुग्णालय शहरात सुरू होत आहे. या हॉस्पिटलमुळे जळीत रुग्णांना उपचारासाठी पुणे व मुंबईला हलविण्याची गरज भासणार नसल्याने आपोआपच रुग्णांचा खर्च आणि गैरसोय टळणार आहे. विशेष म्हणजे, नाशिकमध्ये सुरू होणारे बर्न्‍स सेंटर उत्तर महाराष्ट्रात एकमेव असेल, तर पुणे, मुंबई आणि औरंगाबादनंतर ही सुविधा असलेले नाशिक हे राज्यातील चौथे शहर असेल. प्रसिद्ध प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉ. राजेंद्र नेहते यांच्या कल्पनेतून नाशिक बर्न्‍स सेंटर या नावाने हे हॉस्पिटल साकारले जात आहे.

जगातील वेगाने विकसित होणारे सोळावे, तर देशातील चौथ्या क्रमांकाचे शहर म्हणून नाशिकचा झेंडा जागतिक नकाशावर फडकतो आहे. येथील औद्योगिक, शैक्षणिक आणि वैद्यकिय क्षेत्रातील प्रगतीही डोळे दिपविणारी आहे. अगदी कर्करोगापासून प्लॅस्टिक सर्जरीपर्यंतच्या शस्त्रक्रिया येथे सहज होत असून वैद्यकिय शाखांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तसेच उपचार या शहरात उपलब्ध आहेत, असे असले तरी जळीत रूग्णांसाठी अद्ययावत सुविधांसह सुसज्ज हॉस्पिटल शहरात नाही. यामुळे रूग्णांना पुढील उपचा

यामुळे होते कुचंबणा
जळीत रुग्णांना अनेक जनरल हॉस्पिटल्स उपचारार्थ दाखल करून घेत नाही, कारण या रुग्णांपासून जंतुसंसर्गाचा धोका अधिक असतो. छोट्या नर्सिंग होममध्ये पुरेशा सुविधा व प्रशिक्षित कर्मचारी यांचा अभाव असल्याने जळीत रुग्णांवर सर्वांगीण उपचार शक्य होत नाहीत.

असे असेल नाशिक बर्न्‍स सेंटर
मुंबई नाक्यावरील तुपसाखरे लॉन्सच्या मागील बाजूस ‘नाशिक बर्न्‍स सेंटर’ हे दहा बेडचे हॉस्पिटल सुरू होत आहे. त्यात, प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र कक्ष असलेला चार बेड्सचा अतिदक्षता विभाग, दोन बेडचा स्टेप डाउन अतिदक्षता विभाग, तत्काळ उपचार कक्ष, चार स्पेशल रूम्स, दोन ऑपरेशन थिएटर्स, पॅथॉलॉजी लॅब आणि 24 तास औषधालय आणि रुग्णवाहिका उपलब्ध असेल. ज्यात तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत असेल.