आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रस्त्यावर कचरा जाळल्यास यापुढे पाच हजार रुपये दंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रस्त्यावर पालापाचाेळा, कचरा, रबर जाळण्याचे प्रकार वाढल्याने प्रदूषणाच्या पातळीत सर्वत्र कमालीची वृद्धी हाेत अाहे. ही बाब लक्षात घेत नवी दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाने रस्त्यावर कचरा जाळल्यास संबंधितांना पाच हजार रुपयांचा दंड अाकारण्याचा अादेश दिला अाहे. नाशिक महापालिका क्षेत्रात हा अादेश महत्त्वपूर्ण ठरणार अाहे.
घंटागाडी कर्मचारी रस्त्यावर पडलेला पालापाचाेळ्याचा कचरा घेऊन जाण्यास तयार नसल्याने शहरात ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसताे. काही दिवसांनी हा कचरा अक्षरश: कुजायला लागून अाराेग्याच्या समस्या निर्माण हाेतात. ही बाब अाेळखून पालिकेच्याच कर्मचाऱ्यांसह काही नागरिकांकडून कचरा जाळण्यात येताे. दिल्लीतही अशाप्रकारच्या घटना वाढल्याने प्रदूषणाच्या पातळीत कमालीची वाढ झाली अाहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित लवादाने कचरा जाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अादेश दिले अाहेत.

पालिकेच्या कर्मचाऱ्यालाही दंड : पालापाचोळातसेच कचरा जाळण्याच्या प्रथम गुन्ह्याच्या वेळेस ५००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. मात्र, अशीच घटना संबंधितांकडून दुसऱ्यांदा घडल्यास दंडाच्या आकारणीबरोबर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याशिवाय, कचरा जाळण्याबाबतच्या घटनांबाबत महापालिका कर्मचाऱ्यांचा सहभाग राहिला तर त्याच्याविरुद्ध प्रथम वेळेस पाच हजार रुपयांची दंड वसुली करण्यात येईल. दुसऱ्या घटनेनंतर त्यांच्याकडून पाच हजार रुपये दंडाची वसुली आणि प्रशासकीय कारवाई करण्यात येणार अाहे.

तक्रार असल्यास येथे साधा संपर्क
नाशिकमहापालिका क्षेत्रात कचरा जाळण्याच्या घटनांसंदर्भात तक्रार www.nashikcorporation.in या संकेतस्थळावर तसेच Smart Nashik या मोबाइल अॅपवर, ७०३०३००३०० या हेल्पलाइन क्रमांकावर आणि महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांच्या विभागीय अधिकारी यांच्या दूरध्वनी मोबाइल क्रमांकावर दाखल करता येतील.
बातम्या आणखी आहेत...