आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सप्तशृंगगड यात्रा बसला अपघात; 25 प्रवासी जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- एसटीची सप्तशृंगगड यात्रा बस (एमएच 14 बीटी 3623) शनिवारी (दि. 27 ) मध्यरात्री 2 वाजता नाशिककडे येत असताना दिंडोरीरोडवरील मेरी चौकात चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर आदळली. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले. पंचवटी पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली.
जखमींना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, कर्मचारी व डॉक्टर झोपेत असल्याने उपचारास विलंब झाला. आगार व्यवस्थापक राठोड यांनी विचारपूस करत एसटीतर्फे जखमींना प्रत्येकी पाचशे रुपये मदत करण्यात आली. गंभीर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये मनीषा बेंडकुळे, संगीता बेजेकर, विमल बेजेकर, रंजना शेवरे आदींचा समावेश आहे. चालकाचा हलगर्जीपणा : बसचालक मोबाइल फोनवर बोलत असल्याने त्याचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याचे प्रवाशांनी सांगितले.