आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार वर्षीय बालकास स्कूल बसने नाशकात चिरडले, चालकास चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सिडकोतील उपेंद्रनगर भागात बालवाडीतील विद्यार्थ्याचा मंगळवारी दुपारी स्कूल बसखाली सापडून जागीच मृत्यू झाला. परिसरातील रहिवाशांनी संतप्त होऊन बसचालकाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.


अभिनव बालविकास शाळेत शिकणारा सारंग राकेश जाधव (वय 4) यास दररोजप्रमाणे स्कूल बस घरी सोडण्यासाठी आली. दुपारी 11.30 वाजेच्या सुमारास थांब्यावर आजी त्याची वाट बघत होती. चालकाने बस थांबवताच वाहकाने मुलास खाली उतरवत आजीकडे सोपवले. आजीने नातवाचे दप्तर हाती घेत काही अंतर पुढे जात असतानाच सारंग मात्र तिच्या पुढे पळू लागला. याच वेळी बसने जागेवरून वळण घेतले. वाहकाच्या बाजूने बसच्या मागील बाजूस पळणा-या सारंगला धक्का लागला व तो चाकाखाली आला. काही कळण्यापूर्वीच त्याचा अंत झाला.