आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेरी सिग्नलवर तिहेरी अपघात, बेशिस्त चालक, अपघाताचा निमंत्रक...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तारवालानगर सिग्नलवर बसने ट्रकला धडक दिल्याने ट्रक कारवर उलटली. गुरुवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघाताने तिन्ही वाहनांचे नुकसान झाले बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले.
नाशिक- भरधाव एसटीबसनेट्रकला धडक दिल्याने ट्रक कारवर पलटी झाल्याने तिन्ही वाहनांचे नुकसान झाले. गुरुवारी (दि. १०) सकाळी 7 वाजता मेरी-तारवाला सिग्नलवरील या अपघातात बसमधील ५-६ प्रवासी किरकोळ जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसने (एमएच १४, बीटी ०७४२)दिंडोरीरोडकडे जाणाऱ्या ट्रकला (जीजे १५, वायवाय ३३७७) धडक दिली. ट्रक पंचवटीकडून दिंडोरीरोडकडे जाणाऱ्या कारवर पलटी झाली. कारचालकाने प्रसंगावधान राखत बाहेर उडी घेतली. मात्र बसचा दर्शनी भाग पूर्ण खराब होऊन पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातास जबाबदार बसचालकाविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...