Home »Maharashtra »North Maharashtra »Nashik» Bus-Truck Accident Manmad

बस-ट्रक अपघात, बसमधील 35 प्रवासी जखमी, 6 जणांची प्रकृती गंभीर

मनमाड-येवला राज्यमार्गावर सोमवारी रात्री १०.१५ च्या सुमारास मालट्रक आणि राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये अपघात झाला. यामध्

दिव्य मराठी वेब टीम | Oct 10, 2017, 09:11 AM IST

  • बस-ट्रक अपघात, बसमधील 35 प्रवासी जखमी, 6 जणांची प्रकृती गंभीर
मनमाड- मनमाड-येवला राज्यमार्गावर सोमवारी रात्री १०.१५ च्या सुमारास मालट्रक आणि राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये अपघात झाला. यामध्ये बसमधील सुमारे ३५ प्रवासी जखमी झाले असून, त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने नाशिक येथे हलविण्यात आले. काही जखमी मालेगाव येथे मार्गस्थ झाले तर इतर सर्व जखमींवर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात तसेच शहरातील काही खासगी डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. रात्री उशिरापर्यंत ग्रामीण रुग्णालयात गर्दी उसळली होती. नंदुरबार आगाराची (एमएच २०, बीएल ४०९४) बस नंदुरबारहून पंढरपूरकडे जात होती. मनमाड बसस्थानकातून रात्री १० च्या सुमारास या गाडीने प्रस्थान केले.

मनमाड-येवला राज्यमार्गावर शहरानजीक कॅम्प भागात दुभाजक नजरेस आल्याने ही बस दुभाजकावर धडकली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या मालट्रकने (एमएच १८, आरए ६३१९) बसला धडक दिली. अपघातानंतर दोन्हीही गाड्या रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात गेल्या. जोराच्या आवाजाने परिसरातील नागरिक युवा कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढून मिळेल त्या वाहनाने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

अपघातात बसचालक, वाहक आणि इतर तीन असे पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. तिघा जखमींना मालेगावकडे रवाना करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. धोंगडे यांच्याबरोबरच शहरातील डॉ. काझी, डॉ. नीलेश राठी, डॉ. श्री. सौ. जैन, पालिकेचे आरोग्य सभापती डॉ. विनोद ठाकरे आदींनी तातडीने जखमींवर उपचार सुरू केले. नगरसेवक लियाकत शेख, अमिन पटेल, नगरसेवक अमजद पठाण, महेंद्र गरुड, हबीबभाई शेख आदी मदतीसाठी सरसावले. मनमाड आगाराच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमींना तातडीची ५०० रुपयांची मदत देऊ केली.

Next Article

Recommended