आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक संकल्पना मांडा अन् व्हा उद्योजक...,४० लाखांपर्यंतची विविध योजनांतून आर्थिक मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उद्योगसुरू करण्यासाठी एक चांगली कल्पना असेल आणि ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी लागणारे कष्ट करण्याची जिद्द धडाडी अंगी असेल, तर तुम्हाला उद्याेजक होण्यापासून आता कोणीच रोखू शकत नाही. केवळ एका संकल्पनेचे रूपांतर उद्योग सुरू होण्यापर्यंत करण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत आता नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये उपलब्ध आहे. ‘बिझनेस इनक्युबेशन सेंटर’ क्लस्टरने स्थापन केले असून, येथे नामांकित उद्योजकांचेही मार्गदर्शन मिळणार असल्याचे क्लस्टरचे चेअरमन नरेंद्र गोलिया यांनी सांगितले.

होतकरू उद्योजकांना साहाय्य करण्यासाठी इन्क्युबेशन केंद्र सुरू करण्यात आले असून, तरुण उद्योजकांना ही इको प्रणाली साहाय्यीभूत ठरणार आहे. इन्क्युबेशन संस्कृती जागतिक स्तरावर चांगल्या पद्धतीने स्थापित करण्यात आली आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली हे याचे उत्तम उदाहरण असून, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील या प्रकारचे हे पहिलेच केंद्र आहे. वाणिज्य मंत्रालयांतर्गत असलेले औद्योगिक धोरण संवर्धन विभागाचा ‘मेक इन इंडिया’ या राष्ट्रीय उपक्रमाच्या दृष्टीने हे इन्क्युबेशन सेंटर सुरू करून नावीन्यपूर्ण शिक्षणाची द्वारे खुली करण्यात आल्याचे गोलिया यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी क्लस्टरचे उपाध्यक्ष के. एस. पाटील, सीईओ हर्ष गुणे आदी उपस्थित होते.

याक्षेत्रातील कल्पनांचे स्वागत : उत्पादन,कृषी उत्पादन, आयटी, एफएमजीसी, सेवा उद्योग क्षेत्रांतील कल्पनांचे नवउद्याेजकांनी स्वागत केले आहे.

क्लस्टरकडूनमिळणार हे साहाय्य : नवीकल्पना घेऊन येणाऱ्यांना क्लस्टरकडे अर्ज करावा लागेल. क्लस्टरच्या तज्ज्ञ सल्लागारांकडून कल्पना त्यामागील व्यक्ती दाेहोंची व्यवहार्यता तपासली जाईल. कल्पना ती प्रत्यक्षात आणण्याची व्यवहार्यता असेल अशांना या सेंटरमध्ये प्रवेश दिला जाईल. त्यांना पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, मार्गदर्शन, व्यवसाय नियोजन उपलब्ध करून दिले जाईल. मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंगसह नेटवर्किंग, कायदे, व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानग्या, निधी उभारणे आदी मदत केंद्रातून मिळणार आहे. याशिवाय क्लस्टरकडून मासिक शिष्यवृत्तीही दिली जाईल. मात्र त्याला प्रकल्पावर पूर्ण वेळ काम करावे लागेल. यातून उद्योजक घडविता येतील, असे इप्कॉसचे व्यवस्थापकीय संचालक एच. एस. बॅनर्जी यांनी यावेळी स्पष्ट केले.

क्लस्टरच्यामार्गदर्शक समितीचे सदस्य असे : इप्कॉसचेव्यवस्थापकिय संचालक एच. एस. बॅनर्जी, क्रॉम्प्टन ग्रीव्हज्चे माजी उपाध्यक्ष जे. जी. कुलकर्णी, बॉशचे प्रकल्प प्रमुख ए. आर. चिंतवार, रिलाएबल ऑटोटेकचे संस्थापक राजेंद्र बागवे आणि अशॉक बिल्डकॉनचे व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख यांचा क्लस्टरच्या मार्गदर्शक समितीत समावेश असून, तेच उमेदवारांची निवड करतील मार्गदर्शनही करतील.
बातम्या आणखी आहेत...