आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business News In Marathi, Jayesh Thakkar Elect On Credai At Nashik, Divya Marathi

क्रेडाई नाशिकच्या अध्यक्षपदी जयेश ठक्कर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहराच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणार्‍या बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय संघटना असलेल्या क्रेडाईच्या नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी जयेश ठक्कर यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी अभय तातेड आणि राजेंद्र ठक्कर यांची निवड झाली आहे.

शुक्रवारी संस्थेच्या झालेल्या निवडणुकीत एकमताने ही निवड जाहीर करण्यात आली असून, क्रेडाई, नाशिक अर्थात प्रमोटर्स अँण्ड बिल्डर्स असोसिएशन, नाशिकने आपली अविरोध निवडीची परंपरा यंदाही कायम राखली आहे. नाशिक शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सुजाण नागरिकांचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीचे कामकाज छाननी समितीच्या सदस्यांनी केले. त्यांना माजी अध्यक्ष जितूभाई ठक्कर, नेमिचंद पोद्दार, विजय संकलेचा, सदाशिव शुक्ल, राजन दर्याणी, अनंत राजेगावकर, सुरेश पाटील, अविनाश शिरोडे, सुनील भायभंग यांनी सहकार्य केले. मावळते अध्यक्ष किरण चव्हाण यांना स्मृतिचिन्ह प्रदान करीत त्यांच्या कारकीर्दीत केल्या गेलेल्या कामांचा गौरव या वेळी उपस्थितांनी केला.

ही आहे क्रेडाईचे नवी टीम
क्रेडाई नाशिक या संस्थेच्या कार्यकारिणीवर खजिनदारपदी नरेश कारडा, सहसचिवपदी उमेश वानखेडे, प्रदीप पटेल, मानद सचिव सुनील कोतवाल आणि कार्यकारिणी सदस्यपदी प्रकाश संकलेचा, सुजॉय गुप्ता, कृणाल पाटील, रवी महाजन, अमित रोहमारे, शंतनू देशपांडे, उदय घुगे यांचीही निवड झाली आहे. या निवडीचे मान्यवरांनी स्वागत केले आहे.