आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसीतील भूखंडांना आता उद्योग सहभागातून बहार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- औद्योगिक वसाहतीतील रस्त्याच्या कडेच्या मोकळ्या जागा किंवा मोकळे भूखंड आता उद्योगांच्या सहभागातून बहरणार आहेत. याच्या बदल्यात या जागांवर उद्योगांना आपली जाहिरातही करता येणार असून, याबाबतचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाने नुकताच घेतला आहे. यामुळे आगामी काळात शहरातील सातपूर आणि अंबडच नाही, तर िजल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या औद्योगिक वसाहतींचा चेहरामोहरा बदलून जाणार आहे.
औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याचे बांधकाम करताना रस्त्याकरिता असलेल्या राखीव भूपट्ट्याचा विकास करण्यात यावा रस्त्याच्या दुतर्फा , व्यवहार्यता तपासून महामंडळाच्या खर्चाने वृक्षाराेपण करण्यात यावे, असे संचालक मंडळाने स्पष्ट केले आहे. भूखंडासमोरच्या रस्त्याच्या भूपट्ट्यातील मोकळ्या जागेचा विकास, सुशाेभीकरण भूखंडधारकाला उद्युक्त करण्यात यावे आणि या मोकळ्या भूखंडाचा विकास, सुशाेभीकरण केल्यानंतर त्याची पुढील देखभाल दुरुस्तीची जबाबदारी मात्र त्या उद्योजकाला वाहावी लागणार आहे.
चौकांचेही खुलणार सौंदर्य
औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्त्यांवरील अंतर्गत चौकांचे सुशोभीकरणदेखील उद्योजकांना करता येणार आहे. या विकास आणि सुशोभीकरणाच्या बदल्यात त्या-त्या उद्योगांना त्यांचे जाहिरात फलक उभारण्याची वनिामूल्य परवानगी देण्यात यावी असे आदेशीत करतानाच जाहिरात फलकाचा आकार, उंची आदी बाबींचे धोरण निश्चित करण्यात करण्यात येत असल्याचे परिपत्रकाद्वारे यापूर्वीच महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वी होती ही परिस्थिती
औद्योगिक वसाहतीतील मोकळ्या भूखंडांवर कंपाउंड अभावी अतिक्रमणे होत, त्यावर झोपडपट्ट्या उभ्या राहिल्यानंतर हा भूखंड मोकळा करण्यासाठी अतिक्रमण काढण्यासाठी एमआयडीसीला प्रचंड त्रास सहन करावा लागत असे शविाय वेळ आणि पैसाही यात वाया जात असे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलिस बंदोबस्तही घ्यावा लागत असे.
सफाईची जबाबदारी स्थानिक संस्थांची
औद्योगिक वसाहती ज्या क्षेत्रात आहेत त्या ग्रामपंचायती किंवा महापालिका, नगरपालिका यांच्यावर स्वच्छता, आरोग्य सुविधा, औषध फवारणी, कचरा गोळा करणे, कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी राहणार असल्याचे महामंडळाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
मोठ्या उद्योगांच्या सहभागासाठी प्रयत्न
- मोठ्या उद्योगांना याकरिता सहभागी करून घेण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. याकरिता काही उद्योगांशी बाेलणी सुरू झाली आहे. लवकरच या निर्णयामुळे औद्योगिक वसाहतींचे सौंदर्य खुलेल, यात शंका नाही.
मंगेश पाटणकर, सरचिटणीस,निमा