आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Businessman Strike For Stop LBT, Issue At Nashik

एलबीटी कारवाई रोखण्याच्या संकेतामुळे प्रशासन पेचात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुख्यमंत्र्यांनी नाशिक सांगली महापालिका क्षेत्रात एलबीटी विवरणपत्र सादर करणाऱ्या व्यापाऱ्यांवरील कारवाई तूर्तास थांबविण्याचे संकेत दिल्याचा दावा व्यापारी संघटनांनी केल्यानंतर तसे झालेच तर अडचणीत येण्याची भीती प्रशासनाला वाटू लागली आहे.
पालिकेने १४ हजार व्यापाऱ्यांना पाच हजार रुपये दंडाची नोटीस पाठविली असून, त्यातील अनेकांनी दंड भरला आहे. त्यांना सवलत देण्याबरोबरच दंडाची कारवाई रद्द केल्यास लेखी आदेश नसताना नोटिसांवरील कारवाई थांबविल्याचा ठपका ठेवत लेखापरीक्षकांकडून विचारणा होण्याचीही भीती आहे. दुसरीकडे, एलबीटी भरण्यास मुदतवाढीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी िदले असताना महापालिकेकडून खुलासा नसल्याने व्यापारी संभ्रमात आहेत. सोलापूर महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध करून विवरणपत्र भरण्यास आणि एलबीटी भरण्यास मुदतवाढ देत असल्याचे स्पष्ट केले आहे. गुरुवारी होणाऱ्या महासभेत याबाबत महापालिकेने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे. २६ डिसेंबरला नाशकात येणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे व्यथा मांडण्याची तयारी फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ मर्चंट‌्स करीत आहे.