आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यावसायिकांनी रस्ताच केला काबीज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गंगापूरराेडच्याबहुसंख्य हाॅटेलमालकांनी पार्किंगच्या जागेवर हाॅटेल वाढविले असून, ग्राहकांना वाहने रस्त्यावर पार्क करण्यासाठी भाग पाडले जात अाहे. त्यामुळे हाॅटेलसमाेरील रस्ते अतिशय अरुंद झाले असून, या भागांमध्ये नेहमीच वाहतुकीचा खाेळंबा झालेला दिसताे. संबंधित व्यावसायिकांनी केलेली अतिक्रमणे हटविल्याशिवाय ही समस्या सुटूच शकत नसल्याचेही निरीक्षणांतून पुढे अाले अाहे.
काही महिन्यांपूर्वी गंगापूरराेड परिसरात अतिक्रमण निर्मूलन माेहीम राबविण्यात अाली हाेती. त्यात मुख्यत: हाॅटेल व्यावसायिकांकडे लक्ष केंद्रित करण्यात अाले हाेते. या माेहिमेमुळे गंगापूरराेडने त्यावेळी माेकळा श्वास घेतला, तरीही त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच संबंधितांनी पुन्हा एकदा अतिक्रमणे करून जागा व्यापली आहे. परिणामी, पार्किंगच्या जागा माेकळ्या हाेता तेथे पुन्हा एकदा वाहने उभी राहू लागल्याचे दिसून येत आहे. अनेक हॉटेल्सच्या भिंतींवर पार्किंगचे फलकही झळकत असल्याने समस्येत भरच पडत आहे
.
२५टक्के अतिरिक्त जागा साेडण्याची गरज : नगररचनाअधिनियमानुसार अपेक्षित असलेल्या पार्किंगव्यतिरिक्त बिनरहिवासी भाग साेडून पार्किंगसाठी अतिरिक्त २५ टक्के अतिरिक्त जागा साेडणे अावश्यक अाहे. परंतु, नाशिकमध्ये या नियमाचे पालनच झाले नसल्याचे निदर्शनास येत अाहे.

माेठ्या हाॅटेल्सनेदेखील पार्किंगसाठी जागा साेडण्याचे तारतम्य बाळगलेले दिसत नाही.
झाडांचा अडथळा असतानाच अशा सोयीच्या पार्किंगमुळे रस्ता छोटा झाल्याचे दिसून येते.
थेट रस्त्यावरील पार्किंगमुळे रात्रीच्या वेळी वाहतुकीचा खाेळंबा होणे नित्याचेच झाले आहे.
अनेक हाॅटेलच्या भिंतीवरच पार्किंगचे असे फलक लावण्यात अाले असून, त्यामुळे चारचाकी, दुचाकी वाहने अशी रस्त्यावरच उभी केली जातात.