आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bussiness Man Of Nashik Interested In Going To South Africa

नाशकातील उद्योजकांना दक्षिण आफ्रिकेचे वेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशकातील उद्योजकांना दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याचे वेध लागले असून, या दौऱ्यातून उद्योग-व्यवसायवृद्धीच्या नव्या संधीही मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दक्षिण आफ्रिकेत नाशिकच्या उद्योजकांनी यावे, तेथील उद्योगांत गुंतवणूक करावी किंवा व्यापार वाढवावा, याकरिता तेथील सरकार प्रयत्नशील असून, त्या देशांतील िवदेश मंत्रालयाकडून निवडक उद्योजकांची यादी मागविली आहे, जी स्थानिक उद्योग संस्थांकडून पाठविण्यातही आली आहे.

फेब्रुवारी २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा हा दौरा होत असून, त्यात जोहान्सबर्गसह कांगो, झिम्बाब्बे आदी देशांचा समावेश आहे.

शहरातून दहा उद्योजक आफ्रिकन सरकारचे खास अतिथी म्हणून या दौऱ्यात सहभागी होत आहेत.

इलेक्ट्रिक, इलेक्‍ट्रॉनिक्स, रबर कास्टिंग अ‍ॅण्ड कोटिंग, फॅब्रिकेटिंग इंजिनिअरिंग या प्रकारांतील उद्योजक या दौऱ्यात असतील. अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनला या दौऱ्याकरिता निमंत्रित करण्यात आले असून, त्यांच्याकडूनच याबाबतची कार्यवाही आफ्रिकन दूतावास पार पाडत आहे. वीस उद्योजकांची यादी या विभागाला पाठविण्यात आली असून, त्यापैकी दहा जणांना या दौऱ्याकरिता निमंत्रित केले जाणार आहे.

दरम्यान, वाढत्या जागतिकीकरणात बदलत्या औद्योगिक धोरणांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील उद्योजकांना ही संधी मिळाल्याने उत्साहाचे वातावरण असून, अनेक जण त्यासंदर्भातील माहिती घेताना दिसून येत आहेत.

फेब्रुवारीमध्ये होणार दौरा
-फेब्रुवारीमहिन्यात हा दौरा नियोजित असून, त्यात सहभागी होण्याकरिता आमच्या सदस्यांची एक बैठक नुकतीच झाली. त्यात उत्पादनांची जी मागणी आहे, त्यानुसार २० उद्योजकांची यादी आफ्रिकन दूतावासाला पाठविण्यात आली आहे. -ज्ञानेश्वर गोपाळे, माजीअध्यक्ष, आयमा

कशी होणार वसाहत सुंदर?
-दक्षिणआफ्रिकेत नाशिकच्या उद्योजकांनी यावे, तेथील उद्योगांत गुंतवणूक करावी किंवा व्यापार वाढवावा, याकरिता तेथील सरकार प्रयत्नशील आहे. ही बाब निश्चितच दिलासादायक असून, आफ्रिकन देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग-व्यापाराच्या संधी आहेत. त्या नाशिकच्या उद्योगांना या दौऱ्याच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहेत. या देशांत औद्योगिक उत्पादनांची निर्यात यामुळे वाढविता येणार आहे. विवेकपाटील, अध्यक्ष,आयमा