आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनिवडणुकीत लढत भाजप-शिवसेनेतच, पालिकेच्या दोन जागा पक्षांसाठी रंगीत तालीम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - मनसेसाेबत काडीमोड घेऊन शिवसेनेत गेलेल्या दोन्ही नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. या रिक्त पदावर पाेटनिवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाने महापालिकेला आदेश दिले अाहेत. त्यानुसार नाशिकरोडला ही पोटनिवडणूक लढविण्याची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली अाहे. यामध्ये खरी लढत भाजप सेनेतच होणार असल्याचे चित्र आहे.
एकप्रकारे ही निवडणूक म्हणजे महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रंगीत तालीम असून, यात जाे विजयी होईल त्यावर आगामी महापालिका निवडणुकीत जनमताचा कौल लक्षात येणार आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तयारी सुरू केली असली तरी खरी लढत भाजप शिवसेना यांच्यात होणार आहे. भाजपच्या नाशिकरोड मंडलाची रविवारी बैठक झाली. यानंतर आम्ही ही निवडणूक स्वतंत्र लढविणार असल्याचे मंडलाध्यक्ष बाजीराव भागवत यांनी सांगितले.

मनसेने नाशिकरोड येथील वॉर्ड क्रमांक ३६ अचे नगरसेवक नीलेश शेलार वॉर्ड क्रमांक ३५ बच्या नगरसेविका शोभना शिंदे यांनी महापौर निवडणुकीत गद्दारी करून मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे तत्कालीन मनसेचे गटनेते अशोक सातभाई यांनी पक्षांतर केल्याप्रकरणी दोघांचेही पद रद्द करावे, यासाठी न्यायालयात दावा केला होता. त्यानुसार दोन्ही नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले होते. त्यामुळे या जागांवर पोटनिवडणुका होणार हे निश्चित होते. मात्र, अल्प कालावधी असल्याने उमेदवारीसाठी इच्छुक पुढे येत नसले तरी पक्षांसाठी ही रंगीत तालीम ठरणार आहे. त्यानंतरच खरे महानाट्य पाहण्यास मिळणार आहे.

“एकला चलो रे...’
नाशिकरोडला तर भाजपने सामाजिक कार्यक्रमांचा लावलेला जोर, पक्षाचे शहराध्यक्ष आमदार सानप यांनी मतदारसंघाच्या माध्यमातून आणलेला निधी या जोरावर कार्यकर्त्यांनी ‘एकला चलो रे’चा मार्ग स्वीकारला अाहे. तरतळागाळाशी सेनेला भक्कम पायाचा लाभ मिळू शकतो.
बातम्या आणखी आहेत...