आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेच्या नाकावर टिच्चून हाेर्डिंगवाॅर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने नाशिक शहर कात टाकत असताना, दुसरीकडे मात्र उच्च न्यायालयाचे अादेश धाब्यावर बसवून शहरात माेक्याच्या ठिकाणी हाेर्डिंगवाॅर सुरू झाले अाहे. अनधिकृत हाेर्डिंग लावल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे अादेश असताना, पालिका प्रशासनाकडून मात्र त्यादृष्टीने गेल्या काही दिवसांत फारशी कारवाई झाली नसल्याचे चित्र अाहे.

सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी नाशिक शहराचे हाेर्डिंगमुळे हाेत असलेल्या विद्रुपीकरणाकडे लक्ष वेधत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. अशाच याचिका मुंबई, पुण्याबराेबर अन्य माेठ्या शहरांशी संबंधित असल्यामुळे न्यायालयाने एकत्रित सुनावणी घेत जेथे अनधिकृत हाेर्डिंग असेल त्या संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे अादेश िदले. त्यानुसार, नाशिक महापालिकेने प्रारंभी कठोर पावले उचलत माेठ्या व्यक्तींविराेधात गुन्हे दाखल केले हाेते. सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या चिरंजीवावरही गुन्हे दाखल झाले हाेते. गेल्या काही महिन्यांपासून कारवाई थंडावली हाेती. सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रशासन व्यस्त असल्याचे बघून शहरात बिनधास्तपणे काेठेही हाेर्डिंग लावण्यापर्यंत मजल गेली हाेती.

अनधिकृत होर्डिंग्जसंदर्भातील तक्रारी अाल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली, मात्र त्यानंतर कारवाई थंडावल्याने राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची हिंमत वाढली आणि त्यातूनच अनेक ठिकाणी दिमाखात हाेर्डिंग लावण्यात आले. संपूर्ण शहरभरात सिंहस्थानिमित्त चाैकांचे सुशाेभीकरण सुरू असताना, दुसरीकडे अशा ठिकाणी मध्यभागी हाेर्डिंग्ज लावले जात अाहेत.

शहरातील पंचवटीसह सिडको, सातपूर, नाशिकरोड या उपनगरांनाही अनधिकृत होर्डिंग्जच्या समस्येने ग्रासले आहे. सार्वजनिक ठिकाणे, चौक, इमारती, बसथांब्यांसह महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांचादेखील अशा होर्डिंग्जने ताबा घेतला आहे. यापूर्वी चौकांसह रस्त्यातील अशा होर्डिंग्जमुळे अनेक अपघातही झाले आहेत. असे असतानाही त्याकडे महापालिकेची डोळेझाक सुरू आहे.

दुर्लक्ष झाल्याने लक्ष वेधणार
अनधिकृतहाेर्डिंग्ज लावल्यास गुन्हे दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे अादेश अाहेत. मात्र, महापालिकेकडून याेग्य पद्धतीने कारवाई हाेताना िदसत नाही. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर अायुक्तांचे लक्ष वेधणार अाहे. रतन लथ, याचिकाकर्ते

संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करणार
नाशिक शहरात अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्या व्यक्तींविराेधात गुन्हे दाखल केले जातील. तसे लेखी अादेशदेखील विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले अाहेत. अनधिकृत होर्डिंगबाबत आता पुन्हा कारवाई केली जाईल. राेहिदास बहिरम, उपायुक्त, महापालिका