आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी सी-मॅट प्रवेश परीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीइ) या संस्थेतर्फे शैक्षणिक वर्ष २०१६ २०१७ मध्ये एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सी-मॅट प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. एमबीएसाठीची प्रवेश परीक्षा १७ जानेवारी २०१६ रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
एमबीएसाठी प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा अनिवार्य असते. २०१६ २०१७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाकरिता एआयसीटीइतर्फे सी मॅट (कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट) प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच पदवीच्या अंतिम वर्षाला असलेले विद्यार्थी प्रविष्ठ राहू शकतात. क्वांटेटिव्ह टेक्निक्स आणि डाटा इंटरप्रेटेशन, लॉजिकल रिजनिंग, लॅग्वेज कॉम्प्रेशन, जनरल अवरनेस या चार विषयांवर एकूण ४०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा होईल.

प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एमजीव्ही संचलित पंचवटी येथील एमबीए कॉलेज, संदीप फाउंडेशन एमबीए कॉलेज अाणि डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये माहिती कक्ष सुरू करण्यात आला आहे. नाशिकमध्ये एमबीए अभ्यासक्रमाची २४ महाविद्यालये असून, त्यात प्रवेशासाठीच्या १२२४ जागा आहेत. प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत.

अशी होईल परीक्षा
अॉनलाइन नोंदणी : नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०१५
प्रवेशपत्र उपलब्ध : जानेवारी २०१६
ऑनलाइन परीक्षा : १७ जानेवारी २०१६
परीक्षेचा निकाल : २१ जानेवारी २०१६