आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील वर्षीपासून ‘सीए’अभ्यासक्रम 5 वर्षांचा, वस्तुनिष्ठ आणि दीर्घोत्तरीय पेपर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया'तर्फे घेण्यात येणाऱ्या सी.ए. परीक्षेच्या अभ्यासक्रम नावातही एप्रिल २०१६ पासून बदल करण्यात येणार आहेत. यापुढे ही परीक्षा वस्तुनिष्ठ आणि दीर्घोत्तरीय होईल. पहिल्या परीक्षेसाठी दोन पेपर दीर्घोत्तरीय, तर दुसऱ्या परीक्षेचे सात विषयांचे आठ पेपर होणार आहेत. यापुढे विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ अभ्यासासोबतच दीर्घोत्तरीय स्वरूपाचाही अभ्यास करावा लागेल.
या बदलाबाबत तज्ज्ञांची मते सूचनाही मागविण्यात येत आहेत. त्यासाठी ४५ दिवसांची मुदतही देण्यात आली असून गरज भासल्यास या अभ्यासक्रमात अंशतः बदलाची शक्यता आहे.

सद्य:स्थितीत हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असून चारही विषयांचे स्वरूप वस्तुनिष्ठ आहे. मात्र, नव्या बदलानुसार चारपैकी दोन विषय हे वस्तुनिष्ठ आणि दोन विषय दीर्घोत्तरी असतील. परीक्षेच्या नावातही बदल झाला आहे. यापुढे ‘सीपीटी'ऐवजी ‘नोमोक्लेचर’ ही नव्या स्वरूपातील प्रवेश परीक्षा घेतली जाईल.

जनरल इंग्लिश आणि बिझनेस कम्युनिकेशन या दोन विषयांचा या परीक्षेत अंतर्भाव करण्यात आला आहे. हे दोन्हीही विषय ५०- ५० गुणांचे असून ते वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील. मोनोक्लेचर परीक्षेमध्ये ‘फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग' आणि ‘क्वॉटिटेटिव्ह अस्पेक्टस' हे दोन विषय दीर्घोत्तराच्या स्वरूपात द्यावे लागणार आहेत, तर ‘मर्कंटाइल लॉ' आणि ‘जनरल इकॉनॉमिक्स' तसेच नव्याने अभ्यासक्रमात आलेले जनरल इंग्लिश आणि बिझनेस कम्युनिकेशन हे विषय वस्तुनिष्ठ स्वरूपात द्यावे लागतील.

परीक्षेत बदल
नवीन गाेष्टीवर भर

>या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळणार आहे. नवीन गोष्टींवर जास्त भर देण्यात आला आहे. २००३ पूर्वीचा जो अभ्यासक्रम होता त्याचीच पुनरावृत्ती होत आहे.
-आनंद झंवर, अध्यक्ष, सी. ए. असोसिएशन नाशिक

फायदा काय?
>बिझनेसकम्युनिकेशन या विषयातून सी.ए. होणाऱ्या विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य वाढेल
>इंग्लिश विषयाचा समावेश केल्यामुळे विद्यार्थ्यांना संवादामध्ये आणि रेग्युलर अभ्यासक्रमात देखील वेगळा अभ्यास करावा लागणार नाही.
>चालू घडामाेडींचा विषय असल्यामुळे सामान्य ज्ञानात भर पडेल

विद्यार्थ्यांना लाभदायक
>बदललेल्याअभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना खूप काही नवे शिकायला मिळणार आहे. फक्त विद्यार्थ्यांनी त्याचा योग्य वापर करून घेणे आवश्यक आहे. बदलांबाबत तज्ज्ञांकडून सूचना मागविण्यात अाल्या असून त्यांनी पारख क्लासेसमध्ये जमा कराव्यात. प्रा.लोकेश पारख, अध्यक्ष - पारख क्लासेस, नाशिक

पेपरची संख्या सातवरून अाठ
पूर्वीपरीक्षेची नावनोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना तीन महिन्यांत परीक्षा देणे अनिवार्य होते, परंतु आता एकदा नावनोंदणी केली की, विद्यार्थ्यांना नऊ महिन्यांत ही परीक्षा देता येईल.

पूर्वी दुसऱ्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर ती नऊ महिन्यांच्या कालावधीत देता येत असे. त्या परीक्षेचे सर्वच विषयांचे पेपर वस्तुनिष्ठ होते, परंतु नव्या स्वरूपानुसार परीक्षेसाठीचा कालावधी १२ महिने करण्यात आला असून या परीक्षेचे नाव इंटरमिजिएट असेल. त्यातही या परीक्षेचे सर्व विषय हे दीर्घोत्तरी असतील.

दुसऱ्या परीक्षेत सात पेपर द्यावे लागत होते. आता विषय सात असले तरीही त्यांची विभागणी पेपरमध्ये. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट विषय वगळला.

इंटरमिजिएटमधील एक किंवा दोन ग्रुप पास झाल्यानंतर आर्टिकलशिप करता येईल. आयटी ट्रेनिंग सॉफ्ट स्किल ट्रेनिंगसाठीचा कालावधी दोनवरून तीन आठवडे करण्यात आला आहे.

पूर्वी आर्टिकलशिपच्या शेवटच्या सहा महिन्यांमध्ये अंतिम परीक्षा देता येत होती. आता मात्र तीन वर्षे पूर्ण झाल्याशिवाय ही परीक्षा देता येणार नाही. अंतिम परीक्षेच्या ग्रुप-२ मध्ये इंटरनॅशनल टॅक्सेशन हा िवषय नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...