आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक केबलचालकांची भूमिका होणार आज स्पष्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- डिजिटलायझेशनची मुदत संपून चार महिने होऊनही केबलचे प्रतिमहिना पॅकेज वा करमणूक कराबाबत निर्णय न झाल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 12) दुपारी 2 वाजता केबलचालकांची हिरावाडीतील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत केबल व्यावसायिकांची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सद्यस्थितीत केबल व्यावसायिकांसह ग्राहकांमध्येही संभ्रम असून, सेटटॉप बॉक्स बसविल्यानंतर व्यावसायिकांसमोर उपजीविकेचे मोठे संकट उभे राहिल्याचे केबलचालक संघटनेचे म्हणणे आहे. जिल्हाधिकार्‍यांना अडचणींसंदर्भात निवेदन देऊनही अद्याप तोडगा निघाला नसून सारे अधिकार एमएसओंना (मल्टी सिस्टीम ऑपरेटर) देण्यात आले आहेत. सेटटॉप बॉक्स, करमणूक कर अशा विविध प्रश्नांवर योग्य भूमिका घेण्यासाठी आयोजित बैठकीस महाराष्ट्र केबल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन विनय टांकसाळे, नूरभाई शेख, अनिल खरे, अजय नेमाडे यांनी केले आहे.