आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४३ केबल चालकांचे कनेक्शन होणार बंद , कर न भरल्याने कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जुलैमहिन्यातील कराचा भरणा केलेल्या ४३ केबल चालकांचे कनेक्शन बुधवारपासून (दि. २७) बंद करण्यात येणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी दिली.
केबल चालकांनी कराचा भरणा केल्यानंतर मागील महिन्यातच केबल वाद मिटण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र, अचानक आता ४३ केबल चालकांनी जुलै महिन्याचा कर भरला नसून त्यांनी तो ऑगस्टपूर्वीच भरणे आवश्यक आहे. मात्र, त्यांनी तो भरलाच नाही. ४३ जणांकडे लाख ७८ हजार रुपयांचा कर थकला आहे. त्यामुळे त्यांचे कनेक्शन बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय थकीत करावर १८ टक्के उशिरा भरण्यामुळे वाढीव दरही व्याजाच्या स्वरूपात आकारला जाणार आहे.