आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशकात केबलचालकांची बैठक; एमएसओंकडून घेतली करमणूक कराची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- करमणूक कराचा तिढा न्यायालय आदेशानंतरही सुटला नाही. याच आदेशाच्या अंमलबजावणीसाठी थेट जिल्हाधिकार्‍यांनीच स्थानिक केबलचालकांची बैठक 3 सप्टेंबरला बोलाविली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सद्यस्थितीत देण्यात येणारा कर भरून घेण्याची शक्यताही वाढली आहे.

डॅश प्रणाली लागू केल्यानंतर कर वसुली ही केबल ऑपरेटरकडून न करता मल्टी सिस्टिम ऑपरेटरकडून (एमएसओ) करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. मात्र, स्थानिक केबलचालकांच्या अस्तित्वाचा धोका निर्माण झाल्याने त्यांनी थेट न्यायालयातच धाव घेतली. त्यावर सुनावणी झाल्यानंतर कर भरून घेण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले. त्यांनी कराची रक्कम घेतली नाही तर ती रक्कम न्यायालयात भरण्यास सांगितले. परंतु, कुठल्या आकडेवारीनुसार पैसे स्वीकारायचे, यावर प्रशासनाची द्विधा मनस्थिती झाली. त्यामुळे 19 ऑगस्टला केबलचालकांनी 20 लाख रुपये न्यायालयात भरले. मात्र, कनेक्शनच्या संख्येवरून प्रशासनाने अद्यापही पैसे स्वीकारले नाही. त्यातून नेमकी परिस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी एमएसओंची मंगळवारी बैठक घेतली. त्यात त्यांनीही केबलचालकांकडूनच कर घेण्याचे सुचविले. त्यानुसार, जिल्हाधिकार्‍यांनी 3 सप्टेंबरला बैठक बोलाविली आहे.