आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तरच जुळेल केबल व्यवसायाचे गणित; करमणूक करात कपात करावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सेटटॉप बॉक्समुळे सर्वच ग्राहकांची नोंद सरकारकडे होणार असल्याने करमणूक करात कपात करण्याची मागणी सर्व केबल व्यावसायिकांनी केली आहे. केबल ग्राहकांची संख्या लपवली जात असल्याचा आक्षेप घेत प्रशासनाने केलेली करमणूक करातील वाढ आता कमी करावी, असे त्यांचे म्हणणे आहे.
केबलसाठी 180 ते 200 रुपये दरमहा आकारणी होत असली तरी प्रत्यक्षात ग्राहकांच्या स्तरानुसार सरासरी 140 ते 150 रुपयेही हाती येत नसल्याचे चालकांचे म्हणणे आहे. एमएसओला 100 रुपये, त्यावर 12.2 टक्के सेवाकर आणि जिल्हा प्रशासनास 45 रुपये करमणूक कर असे एका जोडणीचे 165 रुपये जातात आणि उरलेल्या 15 ते 35 रुपयांत ऑपरेटर रूमचे भाडे, देखभाल खर्च, कर्मचार्‍यांचे पगार, वीजबिल, फोन बिल हे सारे गणित जुळवणे अशक्य असल्याचे केबलचालक सांगतात.

आर्थिक स्तरानुसार..
मी सामान्यांकडून 180 व चांगली स्थिती असलेल्यांकडून 200 रुपये घेतो. 70 रुपये 12.2 टक्के सेवाकरासह मल्टी सिस्टिम ऑपरेटरला देतो. 45 रुपये करमणूक कर भरतो. सहा हजार रुपये अँम्प्लीफायर, बॅटरी आणि सर्व सेटअप ठेवलेल्या घरमालकास भाडे देतो.
-विनय टांकसाळे, भद्रकाली

...तर व्यवसाय बंद करू
केबल हे सेवा क्षेत्र आहे. दर निश्चित नाही. ग्राहकानुसार आम्ही तो ठरवतो. एप्रिल, मे, जूनमध्ये कलेक्शन होतच नाही. हीच परिस्थिती दिवाळीत. सरासरी 140 ते 150 रुपयेच प्रतिग्राहक मिळतात. करमणूक कर वाढला तर ग्राहकांवर बोजा न टाकता व्यवसायच बंद करू.
-अनिल खरे, कॉलेजरोड

गणित कसे जुळवायचे?
माझ्या भागात 30 टक्के गरीब ग्राहक आहेत. त्यांच्याकडून 150 व 70 टक्के ग्राहकांकडून 200 रुपये घेतो. एमएसओला 100 रुपये अधिक 12 रुपये सेवाकर, करमणूक कर 45 रुपये. याव्यतिरिक्त लाइन मेंटेनन्स, कर्मचार्‍यांचे पगार, सारे जाऊन प्रतिजोडणी 20-30 रुपये उरतात.
-अजय नेमाडे, द्वारका

राहते अल्प शिल्लक
इमारतीमध्येच जास्त जोडण्या असल्यास 150 ते 180 रुपये घेत होतो; पण सेटटॉप बॉक्स बसविल्यानंतर 200 रुपये घेतो. करमणूक कर 45 रुपये, एमएसओंसह सेवाकर देऊन आम्हाला 40-45 रुपये शिल्लक राहतात.
-प्रवीण चिटणीस, नाशिकरोड