आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आपत्ती’ व्यवस्थापनावरच आपत्ती, वितरणात गतीसाठी विशेष लक्ष देणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहरात अापत्तीची परिस्थिती आहे. गेल्या मंगळवारी शहरात आलेल्या महापुरानंतर जिल्हा प्रशासनासह महापालिकेकडून ठिकठिकाणी मदतकार्य केले जात आहे. दररोज महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयात शेकडो कॉल्स येत आहेत. मात्र, या कॉल्सवर पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाकडे अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक ठिकाणी मदत गरजेची असतानाही तेथे वेळेवर पाेहोचता येत नसल्याची परिस्थिती आहे. तसेच, विभागाकडे अन्य यंत्रसामग्रीची खरेदीच जास्त झालेली असून, अापत्ती व्यवस्थापनासाठीची यंत्रसामग्री मात्र कमी पडत आहे. विभागातील बोटी वारंवार पंक्चर होत असल्याचेही समोर आले आहे. याचप्रमाणे विभागासाठी वारंवार कर्मचारी भरतीची मागणी होत असतानाही प्रशासनाकडून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्यामुळे विभागात असलेल्या १५४ कर्मचाऱ्यांवरच कामांचा भार येत असल्यामुळे त्यांना २४ तास कामे करावी लागत असल्याचे चित्र अाहे.
२४तासांपासून सर्वच कर्मचारी ‘ऑनड्यूटी’
मंगळवारी शहरात आलेल्या महापुरानंतर शनिवारीही अापत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून हाय अॅलर्ट घोषित करण्यात आल्याने अग्निशमन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांची सुटी शुक्रवारपासूनच रद्द करण्यात आली. तर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना शुक्रवारपासून सुट्टीच दिली नसून २४ तास हे कर्मचारी कामावर असल्याचे समोर आले अाहे.
अापत्तीव्यवस्थापनासाठी यंत्रणाच नाही : महापालिकाप्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्चून आपत्तीच्या परिस्थितीसाठी खरेदी करण्यात आलेली यंत्रणा अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वापरताच येत नाही. याबरोबरच अग्निशमन विभागासाठी खरेदी करण्यात आलेली यंत्रसामग्री गेल्या अनेक वर्षांपासून धूळखात पडलेली आहे. तर, अापत्तीप्रसंगी लागणारी यंत्रणाच या विभागाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.

इतर साहित्याचीच खरेदी अधिक : महापालिकेच्याअग्निशमन विभागात वारंवार साहित्य खरेदी केली जात असल्याचा आरोप होत असताना, अाता पुन्हा एक नवीन वाद समोर अाला आहे. अापत्ती व्यवस्थापनासाठीचे साहित्य खरेदी करता या विभागाने अन्य खरेदीवरच भर दिल्याचे डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर अाले. या विभागासाठी वूड कटरची खरेदीच झालेली नाही.

पंचवटीत एकही बोट नाही
मंगळवारीआलेल्या महापुरानंतर शनिवारीही शहरात पुराची शक्यता वर्तविली गेली. त्यानंतर अापत्ती व्यवस्थापनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असताना गोदाकाठाजवळ असलेल्या पंचवटीतील अग्निशमन दलाच्या कार्यालयातील बोट पंक्चर झाल्यानंतर या विभागाला दुसरी बोटच देण्यात आली नसल्यामुळे अग्निशमन विभागाच्या कार्यपद्धतीवरच शंका व्यक्त केली जात आहे.

लाखांचाकॅमेरा धूळखात
अापत्तीवा पूरपरिस्थितीत पाण्यातील व्यक्ती किंवा वस्तू पाहण्यासाठी अग्निशमन विभागाने सुमारे दोन लाख रुपये खर्चून घेतलेला ‘चॅटर कॅमेरा’ चार वर्षांपासून मुख्यालयाच्या गुदामात पडून अाहे. त्याचा उपयोग एकदाही झालेला नसल्याची बाबदेखील यानिमित्ताने समोर आली आहे.
पंचवटीत एकही बोट नाही, दोन लाखांचा कॅमेरा धूळखात; अग्निशमन विभागाची कुचंबणा
महापुराच्या भीषण अापत्तीचा सामना करताना महापालिकेच्या अग्निशमन दलाची पुरती कसरत झाल्याचे चित्र आहे. पुरेशी यंत्रसामुग्री असतानाही केवळ दीडशे कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक ठिकाणी मदत गरजेची असतानाही पाेहोचता येत नसल्याची परिस्थिती आहे. अग्निशमन दल नियंत्रण कक्षात चाेवीस तास मदतीसाठी दररोज शहरासह जिल्ह्यातून शेकडो काॅल्स येत आहेत. मात्र, अग्निशमन दलाकडे केवळ अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्या सर्व कॉल्सवर जाता येत नसल्याचे चित्र आहे. या गंभीर विषयावर डी. बी. स्टारने टाकलेला हा प्रकाशझाेत...
अपुऱ्या साहित्याअभावी कर्मचाऱ्यांची कसरत, महापालिकेची मात्र सोयीस्कर डोळेझाक
{ अापत्ती व्यवस्थापनासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत?
-शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास अग्निशमन दलाचे कर्मचारी सज्ज आहेत. त्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात अाल्या आहेत.
{अग्निशमन दलात असलेली बोट पंक्चर झालेली आहे. त्याबाबत पुढे काय?
-पंक्चर झालेली बोट दुरुस्त करण्यात आली असून, त्या बोटीचाही आता पुरात मदतीसाठी वापर करता येणार आहे.
{आपत्तीप्रसंगी कर्मचाऱ्यांची कमरता जाणवते का?
-अग्निशमन विभागात संपूर्ण यंत्रसामग्री अाहे. मात्र, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तरीही आम्ही २४ तास ड्यूटी करत आहोत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही मदतकार्यासाठी तयार आहोत.

रुग्णवाहिकेचा एकदाही वापर नाही
अग्निशमन विभागामार्फत घेण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचा आजवर एकदाही वापर झाला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ही रुग्णवाहिका घेतल्यापासून अाजवर त्यासाठी एकही कॉल आला नसल्याचे समोर आले आहे. या रुग्णवाहिकेसाठी शहरातील एकाही भागातून कॉल्स येत नसल्यामुळे ती कंट्रोलला पडून आहे.
व्ही. बी. गायकवाड, उपअग्निशमन अधिकारी

चार वर्षांपासून कर्मचाऱ्यांना ड्रेसही नाही
गेल्याकाही वर्षांपासून अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना गणवेश बूटदेखील दिले गेले नसल्याचीही बाब समोर अाली आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर कोट्यवधींची यंत्रणा खरेदी केली जाते, त्यांच्या सुरक्षिततेसाठी या विभागामार्फत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी सिंहस्थात अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना एका खासगी कंपनीमार्फत देण्यात अालेले रेनकाेटही यावर्षी देण्यात अाले नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविली.

अनेक महत्त्वपूर्ण साहित्य पडून
अग्निशमनविभागामार्फत कोट्यवधी रुपये खर्च करून घेण्यात अालेल्या अनेक वाहनांसह साहित्य पडून आहे. तसेच, लाखो रुपयांच्या या वाहनांमधील अनेक साहित्य गायब झालेले आहे. तसेच, काही वाहने उपयोगात नसल्यामुळे त्या वाहनातून ऑइलची गळती होत आहे. विभागातील नवीन पोर्टेबल पंप वापरात नसल्यामुळे निकामी झालेले आहेत. याच विभागात गेल्या चार वर्षांपासून लॅडर पडून अाहे. याचबरोबर पाण्याच्या मोटारी गुदामात पडून आहेत. तर, सिंहस्थात घेतलेल्या ट्रॉली मशिनदेखील पडून असल्याची माहिती समोर आली आहे.

५५० पदांची आवश्यकता
महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये १९९४ च्या मंजूर पदांनुसार १५४ कर्मचारी कार्यरत असून, ६८ पदे रिक्त आहेत. शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता जानेवारी २०१४ मध्ये महासभेने ३२० पदांना मंजुरी देत त्याबाबतचा ठराव राज्य शासनाकडे पाठविला होता. परंतु, अद्याप शासनाकडून त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. अग्निशमन दलात सुमारे ५५० पदांची आवश्यकता आहे. अग्निशमन दलात सद्यस्थितीत उपमुख्य अग्निशमन अधिकारी, दोन विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी, पाच स्टेशन आॅफिसर, एक सब आॅफिसर अशी विविध पदे रिक्त आहेत.

लाइफ जॅकेटही पडून
अग्निशमन विभागा मार्फत लाइफ जॅकेट लाइफ रिंगची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात अाली आहे. मोठ्या प्रमाणावर खरेदी केलेल्या या लाइफ जॅकेट रिंग सध्या अग्निशमन मुख्यालयाच्या गुदामात पडून असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली अाहे.

नवीन बोटी मात्र, वापरातच नाही
पालिकेच्या अग्निशमन विभागाने दोन नवीन फायबर बोटी खरेदी केल्या अाहेत. त्यातील एक कोपरगावातील अग्निशमन विभागाला देण्यात अाली. तर, दुसरी सातपूर विभागीय अग्निशमन कार्यालयास देण्यात आली. लाखो रुपये खर्च करून घेण्यात अालेल्या या बोटीत कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी लागणारे साहित्य वा यंत्रणा नसल्यामुळे या दोन्ही बोटी वापराविनाच पडून असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.

मुख्यालयातच ठिकठिकाणी गळतीचे ग्रहण
अग्निशमन विभागाकडून गेल्या काही वर्षांत काेट्यवधी रुपयांच्या साहित्य खरेदीवर सातत्याने भर दिला जात आहे. मात्र, अग्निशमन दलाचे मुख्यालय असलेल्या शिंगाडा तलाव येथील कार्यालयाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. या कार्यालयात ठिकठिकाणी गळती लागलेली असून यामुळे अनेक महत्त्वाच्या फाइल्स खराब झाल्या आहेत.

पंक्चर बोटींचा झाला वापर
मंगळवारच्या महापुरानंतर शहरासह जिल्ह्यातील मदतकार्यात पॅच लावून पंक्चर बोटीचा वापर करण्यात आला. अशी बोट वापरताना पाण्यात पुन्हा ती पुन्हा पंक्चर झाल्यास जीवितहानीची भीती कर्मचाऱ्यांनी वर्तविली. तसेच, या बोटी पंक्चर झाल्यानंतर त्याचा दुरुस्ती खर्चही कर्मचाऱ्यांना करावा लागत असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

अवघ्या दोन बोटींचा आधार
काही दिवसांपूर्वी अहिल्याबाई आश्रमशाळेजवळ पाण्यात ३० व्यक्ती अडकल्या होत्या. त्यांना बाहेर काढण्यासाठी एक बोट देण्यात आली हाेती. तीही पंक्चर झाल्याने आता पालिकेच्या अग्निशमन दलाकडे केवळ दोनच बोटी मदतकार्यासाठी उपलब्ध आहेत. तर, एक फायर बोट शिंगाडा तलाव येथे मुख्यालयात आहे. मात्र, या बोटीत कोणत्याही प्रकारचे साहित्यच उपलब्ध नसल्यामुळे बोटीचा वापर केला जात नसल्याची बाबही समोर अाली आहे.
बातम्या आणखी आहेत...