आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅमेरूनची राजकन्या सौंदर्य उपचारासाठी नाशिकमध्ये!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कॅमेरून या देशाची राजकन्या एस्थेर ना एसिएने ऊर्फ अँस्टर डिवायन यांनी त्यांच्या भारत भेटीदरम्यान नाशिकला येऊन येथील डॉ. प्रकाश वेरेकर यांच्याकडे सौंदर्यासंबंधी उपचार करून घेतले. राजकन्या अँस्टर या कॅमेरूनमधील मुख्य जमातीच्या राजकन्या असून त्यांचे घराणे इजिप्तच्या राजघराण्याचे वंशज आहेत. सध्या त्या पॅरिसमध्ये संगीतात उच्च शिक्षण घेत आहेत.

भारत भेटीत दिल्लीनंतर अलाहाबादच्या कुंभमेळ्यात उपस्थित राहून राजकन्या अँस्टर थेट नाशकात आल्या. वर्षभरापूर्वी त्यांनी इंटरनेटवरून डॉ. वेरेकर यांच्याबद्दल माहिती मिळविली होती. डॉ. वेरेकर यांच्याकडून त्यांनी आपल्या नाकाचा आकार कमी करून घेतला. तसेच चेहर्‍यावरील सुरकुत्या घालवून त्वचेचा काळेपणा कमी करून 25 टक्के गोरेपणा त्यांनी मिळविला.

भारत दौरा आटोपून त्या युरोप व रशियाच्या दौर्‍यावर जाणार आहेत. सौंदर्यविषयक अधिक उपचार करण्यासाठी त्या पुन्हा भारतात परत येणार आहेत. अँक्युपंरने नाकाच्या सौंदर्यीकरणाचे तंत्र डॉ. वेरेकर यांनी जगात प्रथमच विकसित केले असून, त्याचा वापर करणारे ते एकमेव आहेत.