आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमरून यांचा स्वबळावर सरकार स्थापण्याचा प्रयत्न, अर्थ, गृह खाती जुन्या मंत्र्यांकडेच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा डेव्हीड कॅमरून यांचे सरकार स्थापन झाले आहे. फरक इतकाच आहे की, या वेळी ते दुसऱ्या कुठल्या पक्षाची मदत घेता स्वबळावर सरकार स्थापन करणार आहेत. २३ वर्षानंतर प्रथमच कंझर्व्हेटीव्ह पक्ष स्वबळावर सरकारमध्ये आला आहे. दुसऱ्या टर्ममध्ये कुणाला मंत्री करायचे कुणाला नाही यावर कॅमरून आठवडाअखेरीपर्यंत निर्णय घेतली. परंतु त्यांनी मागच्या सरकारमधील चार मंत्र्यांना बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात अर्थमंत्री जॉज ओस्बोर्न, गृहमंत्री थेरेसा मे, परराष्ट्रमंत्री फिलिप हेमंड संरक्षणमंत्री मायकल फॅलन. ओस्बार्न यांना उपपंतप्रधान म्हणूनही पदभार दिला जाईल, अशी शक्यता आहे.

बहुमताने विजय मिळाल्यामुळे निवडणूक प्रचारात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील, असे कॅमरून यांनी म्हटले आहे.
स्टर्जन यांचा इशारा
कॅमरूनयांनी यात स्कॉटलंडला जादा अधिकार देण्याच्या आश्वासन पूर्ण करणार असल्याचे महटले आहे. परंतु स्कॉटलंडमध्ये ५६ जागा जिंकणारे एसएनपीचे नेता निकलो स्टर्जन यांनी पंतप्रधान कॅमरॉन यांना सुखाने राज्य करू देणार नाही असा इशारा दिला आहे. स्कॉटलंडकडे त्यांना दुर्लक्ष करू देणार नाही. तर त्यांना ठोस निर्णय घ्यायला भाग पाडू असे ते म्हणाले.
पाक वंशाचे १० खासदार जिंकले
ब्रिटनमधीलसार्वत्रिक निवडणुकीत या वेळी पाकिस्तानी वंशाच्या १० खासदारांचा विजय झाला आहे. परंतु ब्रॅडफोर्ड वेस्ट येथून जॉर्ज गॅलोव्हींचा पराभव झाला आहे. नवाझ शरीफ यांचा पीएमएल - एन एमक्यूएम हे दोन्ही पक्ष हा पाकिस्तानचा विजय असल्याचा दावा करत आहेत. गॅलोव्ही यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या नाज शाह यांनी हरवले. नाज यांनी विजयानंतर म्हटले की त्या ब्रिटनच्या संसदेत जम्मू - काश्मीरच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराचा मुद्दा उपस्थित करणार आहेत. पंजाब प्रांतातील माजी राज्यपालांचे पुत्र अनास सरवर हे ग्लास्गो सेंट्रल येथून पराभूत झाले. त्यावरही लोक खुश आहेत. गॅलोव्ही पाकिस्तान एमक्यूएमचे कट्टर टीकाकार आहेत. तर सरवर स्कॉटलंडमध्ये एसएनपीच्या वादळापुढे त्यांचा निभाव लागू शकला नाही.
बहुतांश पक्ष नव्या नेत्यांच्या शोधात
यानिवडणुकीमुळे कंझर्व्हेटीव्ह पक्ष स्कॉटलंडच्या एसएनपी वगळता इतर प्रमुख पक्षांना मोठा झटका बसला आहे. लेबर पक्षाचे नेता अॅड मिलिबँड, लिब डॅमचे नेता निक क्लॅग यांनी निकालानंतर राजीनामे दिले आहेत. आता या पक्षांना नव्या नेत्यांचा शोध घ्यावा लागणार आहे. यूकेआयपीचे नेता निगेल फराज हेही पराभूत झाले आहेत. फराज यांनीही राजीनामा देऊन सुझेन ईव्हान्स यांना प्रभारी अध्यक्ष बनवले आहे.
बातम्या आणखी आहेत...