आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक हद्दपारीसाठी ७० हजार बॉटल्सचा ‘राक्षस’..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकमधून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत, या वाटचालीमध्ये एखाद्या विश्वविक्रमाची नोंद झाल्यास त्याचा जनतेवर चांगला प्रभाव पडतो. या विचाराने मानव उत्थान मंचतर्फे रविवारी (दि. ११) ‘प्लास्टिक मॉन्स्टर’ उपक्रम राबविण्यात अाला. या उपक्रमाच्या माध्यमातून तब्बल ७० हजार प्लास्टिक बाटल्यांचा राक्षस तयार करण्यात अाला अाहे. हा राक्षस तयार करण्यासाठी नाशिककरांकडून संकलित केलेला १० दिवसांचा प्लास्टिक कचरा वापरण्यात आला आहे.
या माध्यमातून ७० हजार प्लास्टिक बॉटल्सपासून ‘मॉन्स्टर’ म्हणजे राक्षस तयार करून त्याद्वारे तीन दिवस प्रबोधन केले जाणार आहे. स्वामिनारायण इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यासाठी प्लास्टिक बाॅटल संकलित केल्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत सोशल मीडिया आणि मौखिक प्रबोधनाच्या माध्यमातून पोहोचण्याचा हेतू या कार्यक्रमाचा आहे. या बॉटल्सपासून तयार केलेला राक्षस रामकुंड, पंचवटी येथे ठेवला जाणार आहे. त्या माध्यमातून प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रकार सांगितले जातील. नाशिकमध्ये दर महिन्याला तीन लाख प्लास्टिकच्या बाटल्यांचा कचरा निघतो. याचा पुनर्वापर होत नाही. पण, अशा प्रकारे प्लास्टिक वापरण्याचे प्रबोधन शहरातील मोक्याच्या ठिकाणी झाले तर फरक पडेल, या उद्देशाने हा कार्यक्रम आखला गेला आहे. याबरोबरच वेगवेगळे खेळ, गप्पा यांच्या माध्यमातून हा राक्षस पाहायला येणाऱ्यांना नाशिकमध्ये१० दिवसांत निघालेला ७० हजारपेक्षा जास्त प्लास्टिक बाटल्यांचा कचरा वापरून त्यापासून हा २६ फूट राक्षस तयार केलेला आहे. ज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड््समध्ये नोंद होणार आहे. यासाठी मंगळवारी गिनीज बुकच्या संबंधितांशी संपर्क करण्यात येणार असल्याची माहिती मानव उत्थान मंचचे जसबीर सिंग यांनी दिली.

या मोहिमेत जोडून घेतले जाणार आहे. ज्याचा फायदा संपूर्णपणे नाशिकच्या प्लास्टिकमुक्तीसाठी होईल, अशी भूमिका संस्थेची आहे. यासाठी सुरू असणाऱ्या प्रबोधनामध्ये लोकांना प्लास्टिकचे अपाय सांगताना प्लास्टिक वापरण्याची शपथ देखील दिली जात आहे. हा राक्षस बनवण्यासाठी जसबीर सिंग, यश भामरे, आकाश पटेल, झाकीया शेख, मीत पटेल, प्रशांत पिंपरीया, अक्षय कुटे यांनी परिश्रम घेतले आहेत.

बातम्या आणखी आहेत...