आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृतीच्या तुलनेत मतदानाचा टक्का अपेक्षेपेक्षा कमीच वाढला, मतदार यादीतील गाेंधळ कारणीभूत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीतील मतदानाचा टक्का यंदा तीनने वाढला असला तरी, सर्व स्तरांवर झालेली जनजागृती अाणि नागरिकांमध्ये मतदानासाठी असलेल्या उत्सुकतेच्या प्रमाणात मात्र टक्केवारी वाढली नसल्याचेच सार्वत्रिक चित्र अाहे.
 
टक्क्यात फार वाढ हाेण्यामागे अनेकांची नावे गायब असणे, पारंपरिक मतदान केंद्रांतील बदल, केंद्र दूरवर असणे, मतदान केंद्रांच्या नावांमधील साधर्म्य अशा अनेक बाबी कारणीभूत ठरल्याचे काही नागरिकांशी झालेल्या संवादातून अधाेरेखित झाले. 
 
म्हसरूळमध्ये एकाच भागातील मतदारांची नावे माेठ्या प्रमाणात नसल्याचे निदर्शनास अाल्यामुळेच अांदाेलन घडून अाले. पण, तुरळक दाेन-चार घरांमागे दाेन-तीन जणांचे नाव नसणे, असलेच तर ते वेगळ्याच मतदान केंद्रावर असणे या सगळ्या बाबीही माेठ्या प्रमाणात घडल्या. पंचवटीतील प्रभाग मध्ये घडलेल्या या प्रकाराबराेबरच प्रभाग अाणि मध्येही नावे गायब असल्याच्या तक्रारी माेठ्या प्रमाणात हाेत्या. तर पश्चिम प्रभागातील प्रभाग क्र. अाणि १२ मधील शेकडाे नागरिकांनाही मतदान यादीत नावच नसल्याचा फटका सहन करावा लागला. 

पूर्व विभागात प्रभाग १३, १४, २३ अाणि ३० मध्येही वर्षानुवर्षे मतदान करणाऱ्या अनेक मतदारांची नावे गायब झाल्याचे दिसून अाले. एकाच घरातील नागरिकांपैकी काहींची नावे १३ मध्ये, तर काहींची नावे १४ मध्ये असेही घडले. सातपूरच्या प्रभाग मध्ये अनेकांची नावे गायब हाेण्याचे, तर प्रभाग ११ मधील इकडची नावे तिकडे अाणि एकाच घरातील मतदारांना तीन मतदान केंद्रांवर मतदान करायला लागण्याचे प्रकारही घडले. या सर्व बाबी मतदारांसाठी प्रचंड तापदायक ठरल्याने अनेकांनी मतदानालाच जाणे टाळले. 

सिडकाेच्या प्रभाग २५ मधील अनेक मतदारांची नावे थेट अंबड गावातील २८ मध्ये टाकल्याचे खूप शाेधाशाेध केल्यानंतर अाढळले. तर निवडणूक सूचनेनंतर रितसर अर्ज भरून दिलेल्या प्रभाग २६ मधील अनेक नागरिकांची नावेही २८ मध्ये तर कुणाची नावेच नसल्याचेही प्रकार घडले. तर प्रभाग २७ मधील सुमारे ५०० मतदारांची नावे २८ अाणि २९ मध्ये टाकण्यात अाल्याने अनेकांनी मतदानाला इतक्या दूर जायला टाळाटाळ केल्याने टक्का वाढण्यास त्याचाही हातभार लागला. 
 
ब्रॅण्ड अॅम्बेसेडर नेमूनही वाढ अल्पच 
मतदारजागृती वाढवण्यासाठी राज्यात अार्ची ऊर्फ रिंकू राजगुरू परशा अर्थात अाकाश ठाेसर यांची नियुक्ती करण्यात अाली हाेती. तर नाशिक महापालिकेने कविता राऊत अाणि चिन्मय उद‌्गीरकर यांना नाशिकमध्ये मतदार जागृतीसाठी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले हाेते. त्यांच्या जाहिराती अाणि सर्व माध्यमांतून हाेणारा प्रचार सामान्य नागरिकांना मतदानासाठी प्राेत्साहित करण्यास पुरेसा हाेता.
 
त्यात व्हाॅट‌्सअॅपवर मिनिटा-मिनिटाला झळकणाऱ्या प्रचाराच्या संदेशांनी सर्व वातावरण निवडणूकमय झाले हाेते. पण, त्या प्रमाणात त्याचे परिवर्तन मतांमध्ये झाल्याचे दिसून अाले नाही. त्यामागे तांत्रिक अडचणी अाणि प्रशासनिक कारभाराचा हात खूप माेठा हाेता.
 
 
बातम्या आणखी आहेत...