आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती करवाढ रद्द करण्याच्या हालचाली, निर्णय अंगलट येताच भाजपचा पवित्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- १२ काेटी रुपयांच्या महसुलापाेटी प्रामाणिक करदात्यांवर १८ टक्के घरपट्टी तर पाच वर्षांत १२० टक्के पाणीपट्टीवाढीचा निर्णय अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागताच महापालिकेतील सत्ताधारी भाजपने बचावात्मक पवित्रा घेत दाेन्ही करातून घरगुती प्रयाेजनाची वाढ रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या अाहेत. दरम्यान, वाणिज्य व्यावसायिक करवाढ कायम राहणार अाहे. 

महापालिकेची अार्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे तसेच स्मार्ट सिटीसाठी निधी उभारणीच्या नावाखाली स्थायी समितीने काही दिवसांपूर्वी घरपट्टी पाणीपट्टीत वाढ केली. ही वाढ इतकी जबर हाेती की सारेच हादरले. स्थायी समितीची मुदत एक वर्षाची असताना त्यांनी तब्बल पाच वर्षांची करवाढ करून टाकली हाेती. मुळात महापालिका क्षेत्रात घरपट्टी पाणीपट्टीचे नेमके लाभार्थी किती याचे सर्वेक्षण सुरू असून त्याचे निकाल काही दिवसातच अपेक्षित अाहे. अाजघडीला अनेक लाभार्थ्यांची मिळकत दाेन्ही करांच्या रेकाॅर्डवर नसल्यामुळे माेठ्या प्रमाणात महसुलात गळती हाेती. या मिळकती रेकाॅर्डवर अाल्यातर करवाढीची गरज पडणार नाही, असाही सूर विराेधकांनी लावून धरला. मात्र, त्यास धुडकावून सत्ताधाऱ्यांनी जबरी करवाढ केल्यानंतर त्याचा भडका महासभेत उडाला. महासभेत थेट महापाैरांचा राजदंड पळवण्यापर्यंत शिवसेनेसह विराेधकांनी टक्कर दिल्याची बाब भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली अाहे. पक्षाला स्पष्ट बहुमत दिल्यानंतर प्रामाणिक करदात्यांवरील वाढीचा मुद्दा अागामी काळात नाराजीचे कारण नकाे म्हणून अाता घरपट्टी पाणीपट्टीतील वाढीतून घरगुती प्रयाेजनाला वगळण्याच्या हालचाली सुरू झाल्या अाहेत. 

भाजपच्या नेत्यांनी महापाैरांना त्याबाबत सुचना केल्या असून प्रामुख्याने घरगुती प्रयाेजनाची वाढ वगळली तर अपेक्षित १२ काेटीच्या महसुलातून किती कपात हाेऊ शकते याची चाचपणी करण्यास सांगितले अाहे. दुसरीकडे, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्याकडूनही नेमकी वाढ किती याबाबत शहराध्यक्ष तथा अामदार बाळासाहेब सानप यांनी माहिती मागवली असून, एकदा स्थायी समितीने वाढ केली की महासभेत प्रस्ताव पाठवून सर्वमान्य हाेईल असा ताेडगा काढला जाणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी खासगीत सांगितले. 

१५ वर्षांचा वनटाइम टॅक्सचा फाॅर्म्युला 
दरवर्षीकिरकाेळ करवाढ करणे अडचणीचे ठरत असल्यामुळे सत्ताधारी भाजपने १५ वर्षांचा एकाचवेळी कर भरण्याची याेजना जाहीर करण्याचा विचार सुरू अाहे. त्यानुसार सध्या अाहे त्या दराप्रमाणे घरपट्टी पाणीपट्टी वसुल करून बँकेत त्याची मुदतठेव ठेवायची. यामुळे पालिकेकडे एकरकमी पैसे येतील व्याजातून फायदा हाेईल, तसेच लाेकांनाही वाढीव कर देण्याची गरज उरणार नाही असा प्रस्ताव असल्याचे सानप यांनी सांगितले. लवकरच महापाैर रंजना भानसी यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना तसा प्रस्ताव दिला जाणार असून, त्यांच्या मान्यतेनंतर लाेकांचे मत जाणून त्याबाबत निर्णय हाेणार अाहे. 

लाेकांना सुसह्य असा निर्णय हाेईल 
घरपट्टी, पाणीपट्टीत नेमकी वाढ किती करावी याबाबत स्थायी समितीकडून ठराव मागवला अाहे. लाेकांना सुसह्य हाेईल असा निर्णय हाेईल. घरगुती ग्राहकांची वाढ वगळण्याचा विचार सुरू अाहे. याबराेबरच कायमस्वरूपी वाढीतून सुटका देण्यासाठी वनटाइम टॅक्स घेण्याचा विचार सुरू अाहे. 
- बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष तथा अामदार, भाजप 

दिनकर पाटील म्हणतात.... करवाढ हाेणारच 
करवाढीवरूनमहासभेत भाजपची झालेली काेंडी शहरात करवाढीविराेधात नाराजीचा सूर बघून एकीकडे पक्षश्रेष्ठी दाेन पाऊले मागे घेत असताना सभागृहनेते दिनकर पाटील यांनी मात्र घरपट्टी पाणीपट्टीतील करवाढ मात्र हाेणारच नाही, असा दावा केला अाहे. शहराचा विकास करण्यासाठी करवाढ करणे चुकीचे नसल्याचे त्यांचे म्हणणे अाहे. 
बातम्या आणखी आहेत...