आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cancelled Kushwah Transferring, Appeal To Chief Minister

कुशवाह यांची बदली रद्द करा; मुख्यमंत्र्यांना साकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या बदलीविराेधात विविध संघटना एकवटल्या असून, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी कुशवाह यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याची नाशिकला गरज असल्याचे म्हटले अाहे. कुशवाह यांना नाशिकमध्ये केवळ सव्वा वर्ष झालेले असून, उत्कृष्ट कामाबद्दल राज्य शासनाने त्यांचा गाैरवही केलेला असताना त्यांची अचानक बदली केल्याने नाशिकचे नुकसान हाेणार असल्याचे निमा, अायमा, महाराष्ट्र चेंबर अाॅफ काॅमर्स, लघुउद्याेग भारती या संघटनांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले अाहे.

कुशवाह यांनी सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासह एक उत्कृष्ट प्रशासक अशी प्रतिमा निर्माण केली अाहे. त्यांना चांगले काम करण्यास अाणखी वेळ देणे गरजेचे हाेते, असे नमूद करून पत्रात म्हटले अाहे की, पावसाचा थेंबन् थेंब साचवण्याच्या दृष्टीने काम उभे करण्याचे नियाेजन कुशवाह यांनी सुरू केले. त्यासाठी उद्याेगांचा हातभार कसा लागेल, या दिशेने कामही सुरू झाले अाहे. त्यासंदर्भातील बैठकांचे नियाेजन उद्याेजक संघटनांकडून सुरू असतानाच कुशवाह यांची बदली झाली अाहे. त्यांना किमान तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू देण्याची मागणी नाशिककरांच्या वतीने या संघटनांनी केली अाहे.

कार्यकाळ तरी पूर्ण करू द्या
केवळ एकवर्षाचा कालावधी झालेला असताना कुशवाह यांची बदली करणे अत्यंत चुकीचे अाहे. त्यांच्या व्हिजनची जिल्ह्याला गरज असून, ही बदली रद्द करण्याची मागणी अाम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली अाहे. - राजेंद्र अहिरे, सरचिटणीस,अायमा

बदली अनाकलनीय
कुशवाह यांना एका बाजूला उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार देऊन शासन गाैरव करते, दुसरीकडे त्यांची बदली करते अाहे, हे अनाकलनीय अाहे. त्यांची बदली रद्द करावी, अशी अामची मुख्यमंत्र्यांकडे मागणी अाहे. - संताेष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष, चेंबर अाॅफ काॅमर्स

बदली सर्वथा अयाेग्य
नाशिकला कुशवाह यांच्यासारख्या चांगल्या अधिकाऱ्यांची गरज अाहे. त्यांची बदली अयाेग्य असून, त्यांना येथे काम करण्यास किमान त्यांचा निर्धारित कार्यकाळ तरी देण्यात यावा. - मंगेश पाटणकर, सरचिटणीस,निमा
पुढे वाचा.. भाजपचे मिशन निवडणूक....