आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Candidates Caste Certificates Return To Satana Tahasildar,

जात प्रमाणपत्राचे 467 प्रस्ताव सटाणा तहसीलकडे परत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सटाणा: कळवणच्या उपविभागीय अधिकारी प्रज्ञा बढे यांनी तांत्रिक कारणामुळे ओबीसी प्रवर्गातील कुणबी जात प्रमाणपत्राचे 467 प्रस्ताव सटाणा तहसील कार्यालयाकडे परत पाठवले आहेत.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रस्ताव परत पाठवल्याने काही उमेदवारांना निवडणूक लढवण्यापासून वंचित राहावे लागणार आहे, तर विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होणार आहे.
कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सेतूने हे प्रस्ताव उपविभागीय कार्यालयाकडे पाठवले होते. मात्र, उपविभागीय अधिकारी बढे यांनी जात प्रमाणपत्र प्रस्तावात टिपणी अपूर्ण असल्याचे कारण देत टिपणीवर तहसीलदार, नायब तहसीलदार, संबंधित लिपिक यांची स्वाक्षरी न घेता हे प्रस्ताव पाठवल्याचे नमूद करून पुन्हा प्रस्ताव सादर करण्याचे कळवले.