आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : महापौरपदासाठी भाजपच्या रंजना भंसी तर उपमहापौरपदासाठी प्रथमेश गिते यांचे अर्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रंजना भन्सी यांनी महापौरपदासाठी तर प्रथमेश गिते यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. - Divya Marathi
रंजना भन्सी यांनी महापौरपदासाठी तर प्रथमेश गिते यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला.
नाशिक - नागपूर, सोलापूर आणि अमरावती पाठोपाठ नाशकातही आगामी काही दिवसांत भाजपचा महापौर स्थानापन्न होणार आहे. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांनी गुरुवारी दुपारी अर्ज दाखल केले. यात रंजना भन्सी यांनी महापौरपदासाठी तर प्रथमेश गिते यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. 

नाशिक महानगरपालिकेमध्ये 122 पैकी 66 जागी विजय मिळवून भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपचाच महापौर होणार हे निश्चित आहे. तसे असले तरी काँग्रेसच्या आशा तडवी आणि राष्ट्रवादी काँग्रसेच्या सुषमा पगारे यांनीही महापौरपदासाठी अर्ज केले आहेत. 

शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना नाशिकमध्ये विरोधी बाकावर बसणार असल्याची माहितीही मिळत आहे. 14 मार्च रोजी महानगर पालिका निवडणूक होणार असल्याने, ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न केले जाणार का, हेही पाहायला मिळणार आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...