आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी ओझं होणार नाही, मला जगू दे..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- ‘गर्भातली कळी आईला विनवणी करते मला जगू दे, मी तुझ्यावर ओझं होणार नाही, माझ्या शिक्षणाची चिंता करू नकोस, माझ्या हुंड्याचीही काळजी करू नकोस.’ अशा हृदयस्पर्शी संवादांनी सिडकोत आयोजित कार्यक्रमातून स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याचा संदेश देण्यात आला.
प्रभाग 42 मध्ये नगरसेवक शिवाजी चुंबळे व नगरसेविका कल्पना चुंबळे यांनी भुजबळ फाउंडेशनतर्फे आयोजित ‘नारा महिला सक्षमीकरणाचा, जागर सावित्रींच्या लेकींचा’ या कार्यक्रमांतर्गत पथनाट्य, एकांकिकांचे आयोजन केले होते. महिलांवर होणारे अत्याचार, समाजाकडून मिळणारी दुय्यम वागणूक, महिलांमधील शिक्षणाचा अभाव, असुरक्षितता या विषयांचा या वेळी ऊहापोह करण्यात आला.
विविध शाळेतील मुलींनी या प्रसंगी एकांकिका सादर केल्या. अतुल नारंग डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी स्त्री भ्रुण हत्या विषयावर नृत्य सादर केले.
कार्यक्रमास भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका शेफाली भुजबळ, नगरसेविका अश्विनी बोरस्ते, नगरसेवक राजेंद्र महाले, समाधान जाधव, सुनीता निमसे, रूपाली गावंड, छाया ठाकरे, रंजना पवार , अजिंक्य चुंबळे, नंदकुमार पवार आदींसह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.