नाशिक- कसारा घाटात पावसाचा आनंद घेण्यासाठी धबधब्याजवळ थांबलेल्या वाहनाला ट्रकने धडक दिली. या अपघातात परभणीचे 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे. कसारा घाटातील सायरी खिंड येथे हा अपघात झाला. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ बघ्यांनी गर्दी केली होती.
वाटेत थांबतात पर्यटक..
पावसाळ्यात कसारा घाटात ठिकठिकाणी असे धबधबे सुरू होतात. पर्यटक वाटेत थांबून धबधब्यांचा आनंद घेतात. अनेकांना भर रस्त्यात थांबून फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही. काही पर्यटक येथे धबधब्याचा आनंद घेताना हा अपघात झाला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करुन पाहा, कसारा घाटातील अपघाताचे फोटो..