आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकारात्मक बातमी: सासुरवाडीला जाताना कार अपघातात मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- अधिक मासानिमित्त सासुरवाडी (जमखंडी, जि. बागलकोट) येथे कारने जाताना नांदणीजवळ समोरून येणाऱ्या सुमो चालकाने कट मारल्यामुळे कार खड्ड्यात पडल्यानंतर एका विवाहित तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे वळणावर घडला.
निनाद हरिकिसन राठी (वय ३७, रा. महेशनगर, सम्राट चौक) यांचा मृत्यू झाला आहे. ते कारमधून (एमएच १३ एसी ६११९) पत्नी मुलांसह जमखंडीला जात होते. नांदणीजवळ आल्यानंतर एका वळणावर असताना टाटासुमो चालकाने कट मारल्यामुळे कार खड्ड्यात जाऊन पडली. त्यात निनाद यांना गंभीर मार लागल्यामुळे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचाराला आणल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पत्नी मुलांना किरकोळ जखम झाली आहे, त्यांची प्रकृती बरी असल्याचे सांगण्यात आले. निनाद यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. फलटण गल्लीत त्यांचा टॉवेलचा व्यवसाय होता. प्राथमिक नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली.