आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भरधाव कार चालवून सहाजणांना केले जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - जेवणझाल्यानंतर शतपावलीसाठी सरदवाडी मार्गावर फिरणा-या सहाजणांना भरधाव अल्टो कारने उडवून दिले. यातील दोघी मायलेकींची प्रकृती अत्यवस्थ असून, त्यांच्यावर नाशिकच्या खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ज्या अल्टो कार (एमएच १५ बीडी ३५७३) चालक विजय पोपट रानडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याने मद्यधुंद अवस्थेत पादचा-यांना धडक दिल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, प्रकृती खालावल्याने त्यास ताब्यात घेऊन उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असल्याचे हवालदार कैलास इंद्रेकर यांनी सांगितले. सरदवाडी मार्गावर मंदा सुनील धनराळे (वय ३५) त्यांची मुलगी आरती (वय १६) यांच्यासह दोन महिला दोन लहान मुले रस्त्याच्या कडेने चालत होते. पाठीमागून भरधाव आलेल्या अल्टाे कारने या सहा जणांना जोराची धडक दिली. त्यात मंदा आरती धनराळे गंभीर जखमी झाल्या. अन्य चारजण जखमी झाले आहेत. चालकाने कार तशीच भरधाव पुढे नेली. आडवा फाट्यावर बसची वाट पाहात असलेल्या प्रवाशांनी कार अतिशय वेगाने आपल्याकडेच येत असल्याचे पाहून जीव वाचविण्यासाठी सैरभैर होऊन पळ काढला. त्यामुळे ते बचावले. तासाभरानंतर चालक रानडे भरधाव गाडी चालवत सरदवाडी रस्त्यावर अाला तेव्हा दीडशेहून अधिक नागरिकांनी त्यास पोलिस येईपर्यंत पकडून ठेवले.