आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अादिती, वासंती चारचाकीत; अारती, गाैरी दुचाकीत अव्वल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
| नाशिक - यॉर्कवुमन्स रॅलीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुचाकी गटात आरती आणि गौरी बुरकुले यांनी, तर चारचाकी गटात अादिती अग्रवाल आणि वासंती पी. के. यांनी वजिेतेपद पटकावले.
रॅलीचा प्रारंभ सजवलेल्या गाड्यांमधून करण्यात अाला. पहिल्या दुचाकीला वाजता यॉर्क वायनरीच्या रवी गुरनानी यांनी झेंडा दाखविला, तर चारचाकी रॅलीला सर्वांगी सारीजच्या अपूर्व भांडगे यांनी झेंडा दाखविल्यावर रॅलीचा प्रारंभ झाला.
बेटी बचावपासून ते परविार बचावपर्यंत वेगवेगळे संदेश रॅलीत सहभागी झालेल्या गाड्यांवरती अतिशय आकर्षक पद्धतीने सजवले होते. या वेळी ५० टक्के महिला स्पर्धक नवीन असल्यामुळे निकालांबाबत उत्सुकता होती. या वेळी अनेक स्पर्धक शिक्षिका, डॉक्टर तसेच उच्चविद्याविभूषित हाेत्या. वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांसह गृहिणीदेखील माेठ्या उत्साहाने या स्पर्धेत सहभागी झाल्या हाेत्या. बक्षीस समारंभ संध्याकाळी यॉर्कच्या प्रांगणात साजरा झाला . स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी आमदार सीमा हिरे स्वत: महात्मानगर भागात उपस्थित होत्या.
खास महिलांसाठीची याॅर्क वुमन्स रॅली रवविारी उत्साहात पार पडली. या रॅलीत ५० टक्के महिला स्पर्धेत नवीन हाेत्या.
नणंद-भावजय जोडी
चारचाकी: कॉम्प.नं. ५४ - प्राजक्ता आणि रूपाली बेस्ट डेकोरेटेड व्हेइकल
दुचाकी: कॉम्प.नं . ६- किरण सलानी आणि वेदिता सोनेजी
चारचाकी: कॉम्प.नं. ४२- मैथिली नाचणे आणि शुभांगी बैरागी