आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार रॅलीचा दिमाखात प्रारंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडताच भगव्या फेट्यांमध्ये सजलेले चालक , नेव्हीगेटर एक-एक करीत सिटी सेंटर मॉलच्या आवारातून बाहेर पडताच टाळ्यांच्या कडकडाटात झालेल्या स्वागताने ‘महिंद्रा अ‍ॅडव्हेंचर रॅली ऑफ महाराष्‍ट्राचा गुरुवारी दिमाखात प्रारंभ झाला.
‘विसा’ने आयोजित केलेल्या या रॅलीच्या प्रारंभावेळी महिंद्राचे बिजॉय कुमार, हॉटेल गेट वेचे नबेन्दू अचारजी, पॉवरड्रीफ्ट टीमचे रोहन अल्बेल आणि अविजित भट्टाचार्य, सिटी सेंटरचे अभय आपटे, सुला विनयार्ड्सचे नीरज अग्रवाल, मोनित ढवळे आदी उपस्थित होते.
नाशिकच्या मुख्य रस्त्यांवरून स्पर्धकांच्या गाड्या परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या. सिटी सेंटर मॉल येथून निघाल्यावर त्या कॉलेजरोड, गंगापूररोडवरून परत सिटी सेंटर मॉलजवळ आल्या. नाशिकची फेरी डांबरी रस्त्यावरील एकमेव फेरी असल्यामुळे सर्वच स्पर्धक जास्तीत जास्त वेगाची अपेक्षा ठेवत आहेत. शुक्रवारी (दि. 13) जूनला शहरी प्रेक्षकांसाठी स्पेशल स्टेजचे आयोजन करण्यात आले आहे.
दादासाहेब फाळके स्मारकाच्या प्रांगणात दुपारी 3 वाजेपासून गाड्यांचे आवाज घुमणार आहेत. शनिवारी (दि. 14) आणि रविवारी (दि. 15) भंडारदरा परिसरात स्पेशल स्टेजेस आयोजित केल्या जाणार आहेत. सह्याद्रीचे नयनरम्य घाट भन्नाट गाड्यांच्या आवाजाने दुमदुमून जातील. स्पर्धक नाशिकमधून सकाळी 6 च्या सुमारास निघतील. ‘विसा’च्या वतीने अश्विन पंडित यांनी हा इव्हेंटदेखील सुरक्षितपणे पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला. स्वाती पंडित यांनी सर्व प्रायोजकांचे आभार मानले.
लक्षवेधी

स्पर्धेच्या प्रारंभाप्रसंगी प्रथम बाहेर पडलेला गतवेळचा विजेता गौरव गिल याला ‘गो गिल गो’चे फलक झळकावत तरुणांनी प्रोत्साहन दिले.
या शर्यतीत नोएडाची गरिमा अवतार, भटिंडाची सुखबन्स मान आणि बेंगळूरूची हर्षिता गौडा या तीन महिलांनी प्रथमच सहभाग नोंदवला असून, त्यातील हर्षिता अवघ्या 18 वर्षांची आहे.