आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष विचलित करून कारचालकांना लुटले; कारमधून रिव्हॉल्वरसह काडतुसे लंपास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नोटा पडल्याचे सांगून कारचालकाचे लक्ष विचलित करीत कारमधून रिव्हॉल्वर-काडतुसे असलेली ब्रिफकेस आणि याच पद्धतीने कारचालकाचा लॅपटॉप, कॅमेरा लांबवल्याचे दोन प्रकार शहरात घडले.

दोन्ही घटना मंगळवारी दुपारी 1 ते 4 वाजेदरम्यान घडल्या. त्यात सुमारे दीड लाखांचा ऐवज लांबवण्यात आला. मेहेर चौकातील गारवा हॉटेलसमोर मकरंद जोशी (रा. रामदास स्वामीनगर) कारमध्ये बसलेले असताना दोघांनी गाडीच्या खाली नोटा पडल्याचे सांगितले. जोशी खाली उतरताच संशयितांनी कारच्या पुढच्या सीटवर असलेली बॅग लांबवली. बॅगमध्ये सुमारे 40 हजारांचा लॅपटॉप व 12 हजारांचा निकॉन कॅमेरा होता. त्यापाठोपाठ रविवार कारंजा परिसरात गोविंद जाधव (रा. हिरापूररोड, ता. चाळीसगाव) हे सफारी कारमध्ये (एमएच19 एपी 9797) बसले असता दोघांनी खाली नोटा पडल्याचे सांगितले. जाधव यांनी कारमधून खाली उतरून पाहताच पुढच्या सीटवरील बॅग दोघांनी लांबवली. बॅगमध्ये सुमारे 70 हजारांचे एक विदेशी बनावटीचे रिव्हॉल्वर, आणि आठ काडतुसे होती.

दरम्यान, रिव्हॉल्वर व काडतुसे बिग बझारसमोरील एका झाडाजवळ सापडली. एका नागरिकाने सरकारवाडा पोलिसांना त्याबाबत माहिती देताच पोलिसांनी बॅग ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यात रिव्हॉल्वर व काडतुसे आढळून आली. रिव्हॉल्वर जाधव यांचेच असल्याचे निष्पन्न झाले.