आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये मोटारींच्या काचा फोडून टेपचोरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मोटारींच्या काचा फोडून कारटेपचोरीच्या घटनांचे सत्र शहरात पुन्हा सुरू झाले असून, शुक्रवारी मध्यरात्री दोन ठिकाणी अशा चोर्‍या घडल्या आहेत.

गोळे कॉलनीत डॉ. अमीत सोपे यांची स्कोडा फेबिया (एम एच 15 सीटी 5766) तर बिग बझारनजीक तुपसाखरे यांच्या दोन कारच्या काचा फोडून टेप चोरल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. डॉ. सोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी रुग्णालयाच्या काचा फोडून दहशत पसरवण्याचा प्रकार घडला होता. रात्री गस्त पथक, बीट मार्शल फिरत असतानाही उपद्रव सुरूच आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. डॉ. सोपे यांचे सुमारे 40 हजार, तर तुपसाखरे यांचे सुमारे 50 हजारांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.