आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमधील फळ बाजारात सात किलो कार्बाइड जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अन्न व औषध प्रशासन विभाग आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांनी पेठरोडवरील शरदचंद्र पवार फळ मार्केटमध्ये छापा टाकून तीन व्यापार्‍यावर कारवाई केली. यात सुमारे सात किलो कार्बाइड जप्त केले.

या मार्केटमध्ये आंबे पिकवण्यासाठी कार्बाइडचा वापर होत असल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणल्यानंतर काही दिवसांच्या अवधीनंतर का होईना प्रशासनाने कारवाई केली. मात्र, कारवाईचा अहवाल संबंधितांनी वरिष्ठांकडे पोहोचवला नसल्याचे समजते. याबाबत प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रकांत पवार यांनी सांगितले की, ‘मी बाहेरगावी असल्याने माहिती देऊ शकत नाही.’ मिळालेल्या माहितीवरून सूरज फ्रूट कंपनीमधील 947 किलो आंबे तपासणीसाठी ताब्यात घेत दोन किलो कार्बाइड जप्त केले. ओम शिवम फू्रट कंपनीमधून 10 हजार किलो आंबे व तीन किलो कार्बाइड हस्तगत केले तर खुशी फू्रट कंपनीमधून 3700 किलो आंबे आणि दोन किलो कार्बाइड जप्त केले.