आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुन्हेगारांना सिमकार्ड देणाऱ्या तिघांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना बनावट कागदपत्रांच्या आधारे मोबाइलचे सिमकार्ड देणाऱ्या तिघांना पोलिसांच्या क्राईम ब्रँच दोनच्या पथकाने अटक केली आहे. अशाप्रकारे सिमकार्ड देणारी मोठी टोळी उघडकीस येण्याची शक्यता पोलिस अधिका-यानी व्यक्त केली आहे.

घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांकडे आढळलेल्या सिम कार्डच्या आधारे पोलिसांनी या दोन संशयितांना जेरबंद केले. शहरातील सर्व पोलिस ठाण्यात घरफोडी, दुचाकी चोरी व लुटमारीचे ३० पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेले सराईत गुन्हेगार राजा राऊत व इरफान शेख ऊर्फ डॉन यांच्याजवळील मोबाइलमध्ये असलेल्या सिम कार्डच्या आधारे पोलिसांना ही धक्कादायक माहिती मिळाली. शहरातील एका दुकानातून सराईतांनी बनावट ओळखपत्र देत दोन सिमकार्ड खरेदी केल्याचे प्रथमदर्शनी उघडकीस आले. सराईत गुन्हेगार राजा राऊत याच्याजवळील सिमकार्ड हे आडगाव येथील योगेश माळोदे यांच्या नावाने काढण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले.

याबाबत अधिक चौकशी केली असता सिमकार्ड खरेदी करताना देण्यात आलेल्या कागदपत्रात योगेश माळोदे यांचे नाव परंतु छायाचित्र दुसऱ्याचे लावण्यात आल्याचे आढळले. या प्रकरणी पोलिसांनी योगेश माळोदे यांना फिर्यादी करत त्यानुसार संशयितांच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी गणेश मधुकर भुसारे (रा. आडगावनाका), इम्तियास शेख (रा. अंबड लिकंरोड) व मदन आप्पासाहेब गाडे (रा. पंचवटी) या तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिस उपआयुक्त संदीप दिवाण, निरीक्षक अशोक भगत, सहायक निरीक्षक साळुंके, राजेश निकम, गणेश घारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितांकडून काही दुकानदारांची नावे पुढे आली असून, पथकाकडून तपास सुरू आहे.