आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Career : Pharmacy Engineering CET's Online Process Starts From Today

करिअर : फार्मसी-इंजिनिअरिंग ‘सीईटी’ची आजपासून ऑनलाइन प्रक्रिया होणार सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - प्रथमच फार्मसी आणि इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेचे (एमटी-सीईटीचे) अर्ज ऑनलाइन भरण्याच्या प्रक्रियेस सोमवारी (दि. 18) प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. 7 एप्रिलपर्यंत प्रक्रिया सुरू राहणार असून, अर्ज भरण्यास कुठलीही अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी तत्काळ संबंधित महाविद्यालयांशी संपर्क साधण्याचे अवाहन महाविद्यालयांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण आणि संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणार्‍या एमटी-सीईटी या इंजिनिअरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा यंदापासून प्रथमच राबविली जात आहे. नाशिक जिल्ह्यातून अंदाजे पाच हजार विद्यार्थी परीक्षेस बसतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. नाशिकची जबाबदारी यंदा सामनगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयास देण्यात आली आहे. माहिती पुस्तिकाही तंत्रनिकेतनमार्फत संबंधित महाविद्यालयांना देण्यात आल्या आहे.

या माहिती पुस्तिकांचे शुल्क संबंधित महाविद्यालयांनी यापूर्वीच विद्यार्थ्यांकडून घेतले असून, या पुस्तिकांचे सोमवारपासून विद्यार्थ्यांना वितरण केले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना पैसे भरल्याची पावती सोबत आणणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची ही प्रक्रिया 7 एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून, 10 व 11 एप्रिलला विलंब शुल्क आकारण्यात येणार असल्याचे महाविद्यालयांच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच एका महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी दुसर्‍याच महाविद्यालयांतून अर्ज भरला तरीही त्याचा स्वीकार केला जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्याच महाविद्यालयातून अर्ज भरला नसल्याबाबत चिंता करू नये. अर्जासोबत कुठलेही कागदपत्राची आवश्यकता नसल्याचे महाविद्यालयांनी सांगितले आहे.

फार्मसी व इंजिनिअरिंगसाठी स्वतंत्र किट
इंजिनिअरिंग आणि फार्मसी शाखेचे या प्रवेश परीक्षेसाठी वेगवेगळे किट असणार आहे. त्यावर एक अँप्लिकेशन आयडी नंबर आणि पासवर्ड बंद स्वरूपात असतील. ते विद्यार्थ्यांनी क्रॅश करावेत. www.dte.org.in/mtcet2013 या संकेतस्थळावर लॉगिंन करावे. त्यावर आपले अँप्लिकेशन आयडी नंबर टाकत आवश्यक ती माहिती भरावी. अर्ज भरल्यानंतर त्याची पुनर्तपासणी केल्यानंतर दोन प्रिंट काढाव्यात. या दोन्ही प्रिंटवर पालक आणि स्वत:ची स्वाक्षरी केल्यानंतर प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्का घ्यावा. त्यातील एक प्रिंट स्वत:कडे परीक्षेचे हॉलतिकीट म्हणून ठेवावी.