आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेटींची कामे घुसवली; महापाैर, अायुक्त अडचणीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दि .जून राेजी झालेल्या महासभेत सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित काेट्यवधी रुपयांची कामे विनाचर्चा घुसवल्याचा मुद्दा चांगलाच तापला असून, शिवसेनेसह स्थायी समिती सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन महापाैर अायुक्तांविराेधात अप्रत्यक्षपणे शरसंधान साधले. विषय मंजुरीपूर्वी निविदा कशा निघाल्या, असा सवाल करीत या महाघाेटाळ्याची राज्य शासनामार्फत चाैकशी करण्याची मागणी केली जाईल, असे शिवसेना गटनेते अजय बाेरस्ते यांनी सांगितले. तर, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांच्यासह सदस्यांनी जादा विषय मंजुरीसाठी विशेष महासभा का घेतली नाही, असा सवाल करीत एकूणच प्रक्रियेबाबत संशय व्यक्त केला.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अाराखड्यातील काही कामांना वगळणे नव्याने मान्यता देण्याचे कारण सांगत िद. जून राेजी झालेल्या महासभेत

मनसे नगरसेवकच अनभिज्ञ
महापालिकेतसत्ताधारी मनसे नगरसेवकांच्या नावाने उपसूचना असूनही त्यांना खबरबात नसल्यामुळे संशय व्यक्त हाेत हाेता. त्यामुळे अापल्यावरील डाग पुसण्यासाठी मनसेचे नगरसेवक यशवंत निकुळे यांनी ठरावासाेबत जाेडलेली उपसूचना काेणती, याची तपासणी केली. त्यात त्यांच्या नावेे साधुग्रामच्या जागेला तारेचे कुंपण प्रवेशद्वार बसवण्याची सूचना हाेती. त्यामुळे मनसेच्या नावाने अन्य कामांचे चांगभले कसे झाले, याचा शाेध घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
५४४ क्रमांकाच्या ठरावाबाबत साध्या एका अाेळीत सन २०१५-१६ अंतर्गत सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात विविध विभागांच्या कामाबाबत असे नमूद करण्यात अाले.
कामात फेरबदल करण्यापूर्वी नगरसेवकांना त्याबाबत अवगत का केले गेले नाही?
निकुळे यांची उपसूचना एका विषयाशी संबंधित असताना अन्य विषयांबाबत सविस्तरपणे उपसूचना वा माहिती का सादर केली नाही?
अायुक्तांना अन्य कामांचे नियाेजन करण्याबाबत अधिकार परस्पर प्रदान कसे केले गेले?