आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cars Glass Beaten Issue At Nashik, Divya Marathi

टवाळखोरांनी फोडली कारची काच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- उत्तमनगर परिसरातील शुभम पार्क येथे बुधवारी रात्री टवाळखोरांनी हैदोस घालत एका कारची काच फोडली. आपसातील वादात त्यांनी हे कृत्य करत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अंबड पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
शुभम पार्कच्या बिल्डिंग नं. 6 येथे बुधवारी रात्री 10 वाजेच्या दरम्यान 9-10 टवाळखोरांनी हैदोस घातला होता. जोरजोरात ओरडणे, एकमेकाला शिवीगाळ करणे व आपसातील भांडणात रस्त्यावरील वाहनावर हल्ला चढवत कारची काच फोडण्याचा प्रकार या गुंडांनी केला. या प्रकारानंतर नागरिक गोळा होताच गुंडांनी धूम ठोकली. अनिष अवटी यांच्या कारची (एमएच 15 डीएस 8808) काच फोडण्यात आली यात 15 हजार रुपयांचे नुकसान झाले.