आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवक शेलार यांच्यासह दाेघांवर ध्वनिप्रदूषणाचा गुन्हा, न्यायालयासह पाेलिस यंत्रणेला अाव्हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टिमचा वापर करून ध्वनिप्रदूषणाची मर्यादा अाेलांडत थेट न्यायालयासह पाेलिस यंत्रणेला अाव्हान देणाऱ्या दंडे हनुमान मित्रमंडळाचे पदाधिकारी तथा नगरसेवक गजानन शेलार मंडळाचे अध्यक्ष राहुल शेलार यांच्यासह डीजेमालकाविराेधात भद्रकाली सरकारवाडा पोलिस ठाण्यात स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करण्यात अाले अाहेत. विशेष म्हणजे, यापूर्वीप्रमाणे जामिनास पात्र अथवा मुंबई पाेलिस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करीत बाेटचेपी भूमिका घेता पाेलिसांनी यावेळी प्रथमच दखलपात्र अाणि कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन पाेलिसांच्या सूचना बेदखल केल्याचे गुन्हे दाखल केले अाहेत. एवढ्यावरच थांबता पाेलिस शेलार काका-पुतण्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई करण्याच्याही तयारीत अाहेत. 
 
श्री गणरायाच्या अागमनाने सर्वत्र निर्माण झालेल्या उत्साह अाणि चैतन्याच्या वातावरणातच विसर्जनही व्हावे यासाठी पाेलिस यंत्रणेने सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळांना अावाहन केले हाेते. यासंदर्भात, ‘दिव्य मराठी’नेही जाहीरपणे ध्वनिप्रदूषण हाेऊ नये, यासाठी स्पष्ट भूमिका घेतली. पाेलिसांनी त्याला प्रतिसाद देत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केल्याने सर्वच स्तरातून त्याचे स्वागत हाेत अाहे. वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे पर्यावरण मानवी आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या साऊंड सिस्टीमबाबत आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे. याच पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मंडळांनी डॉल्बी सिस्टीमचा वापर करताना आवाजाची मर्यादा पाळावी, अशा सूचना पोलिसांनी केल्या होत्या. तरीही मंगळवारी मिरवणुकीत काही मंडळांनी डॉल्बीचा वापर करीत ६५ डेसिबलची ठरवून दिलेली मर्यादा पार करीत सरासरी ९७.२ डेसिबलपेक्षा जादा अावाज केला. हा अावाज कमी करण्याची सूचना पाेलिसांनी वारंवार देऊनही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे भद्रकाली पाेलिसांनी दंड हनुमान मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शेलार, राहुल ऊर्फ बबलू शेलार यांच्याविरुद्ध कार्यकर्त्यांना चिथावणी देत मिरवणूक मार्गात हेतूत: उपद्रव निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. भद्रकाली पाेलिसांपाठाेपाठ सरकारवाडा पाेलिसांनीही या मंडळाला ध्वनिमर्यादा पालनाच्या सूचना करून ते एेकल्याने पुन्हा दुसरा गुन्हा शेलार डाॅल्बीचालक, ट्रकमालकाविरुद्ध दाखल करण्यात अाला. त्याचबराेबर डीजे सिस्टीम, ट्रकही जप्त करण्यात आला आहे. 
 
ध्वनिप्रदूषणाचे शहरात दहा गुन्हे दाखल 
पाेलिसअायुक्त डाॅ. रवींद्र सिंगल, उपअायुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजयकुमार मगर, श्रीकृष्ण काेकाटे, माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहायक अायुक्त, वरिष्ठ निरीक्क्षकांनी ध्वनिमर्यादा ठेवण्याबराेबरच मिरवणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी चाेख बंदाेबस्त ठेवला. दरम्यान, सरकारवाडा, भद्रकाली पाेलिस ठाण्यासह पंचवटी पाेलिस ठाण्यातही चार स्वतंत्र गुन्हे मंडळांविरुद्ध करण्यात अाले अाहेत. पंचवटीतील लामखेडे मळा भागातील धर्मवीर संभाजी राजे मंडळाचे सागर भाऊसाहेब लामखेडे, दिंडाेरी नाका-निमाणीजवळील भडक दरवाजा बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष विक्रम कारभारी मंडलिक, श्रीरामभक्त हनुमान मंडळाचे अध्यक्ष दीपक काशीनाथ चव्हाण (गणेशवाडी) यांच्याविरुद्ध ध्वनिप्रदूषण केल्याचे गुन्हे दाखल करण्यात अाले अाहेत. उपनगर, नाशिकराेड भागातील अाणखी तीन, असे एकूण दहा गुन्हे दाखल झाले अाहेत. ग्रामीण पाेलिसांनीही ५१ मंडळांविरुद्ध ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे दाखल केले अाहेत. 
 
दिव्य मराठी भूमिका 
ध्वनिक्षेपकाच्या अावाजाची कमाल मर्यादा अाेलांडण्याबाबत न्यायालयाने दिलेल्या अादेशालाही जुमानता गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्याचा हट्ट पूर्ण करणाऱ्या जुन्या नाशकातील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्याबद्दल शहर पाेलिस प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले पाहिजे. राजकीय शक्तींच्या दबावाला बळी पडून पाेलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याची अनेक उदाहरणे नाशिककरांच्या मनात ताजी अाहेत. त्या पार्श्वभूमीवर डीजेच्या बाबतीत कायद्यानुसार यथायाेग्य पाऊल उचलण्याच्या पाेलिसांच्या कृतीने शहरातील सूज्ञ नागरिकांना माेठाच दिलासा मिळाला असून यंत्रणेबद्दल अादरही वाढला अाहे. अाता ध्वनिप्रदूषणाबद्दल घेतली, तशीच कठाेर भूूमिका पाेलिसांनी शहरातील बेशिस्त पार्किंग, वाहतूक, वाढती गुन्हेगारी याविराेधात घ्यावी. पाेलिस काेणतीही बेकायदेशीर-नियमबाह्य गाेेष्ट खपवून घेत नाहीत, गुन्हेगारीवर घाव घालतात, हे संबंधितांच्या लक्षात अाले तर अापाेअापच या शहराचा स्मार्ट सिटीकडे सुरू झालेला प्रवास सुलभ अाणि सुकर हाेईल. 
 
 
बातम्या आणखी आहेत...