आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Case Registared Against Jewellar;Three In Hand Of Police For The Inquary

फरार सराफाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा ; चौकशीसाठी तिघे पोलिसांच्या ताब्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर - सातपूर कॉलनी परिसरातील महिलांची फसवणूक करून फरार झालेल्या सचिन उदावंत या सराफाविरुद्ध शुक्रवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात 27 जणांनी तक्रार अर्ज दाखल केले. फसवणुकीत सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी शनिवारी पहाटे चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतले.

सातपूर कॉलनीत नक्षत्र ज्वेलर्स ही फर्म सचिन उदावंत याने सुरू केली. दोन वर्षांपासून सुवर्ण ठेव संचय योजना सुरू करून यात नागरिकांकडून मासिक रक्कम स्वीकारली. सोने मिळणार, या आशेने शेकडो महिलांनी योजनेत पैसे गुंतवले होते. काही महिलांनी तारण ठेवलेले दागिने सोडविण्यासाठी व्याजासह पैसे भरले. त्यांना चार दिवसांच्या अंतराने दागिने घेण्यासाठी बोलाविले होते. मात्र, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सराफाने दुकान न उघडल्याने व त्याचा भ्रमणध्वनीही बंद असल्याने फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला. त्याने शिवाजीनगर परिसरातील आपल्या घरातून ट्रकद्वारे सामान घेऊन रातोरात पलायन केल्याचेही उघड झाले. या सराफाने सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याने त्यास त्वरित अटक करावी; अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा नगरसेवक सलीम शेख यांनी सातपूरच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना निवेदनाद्वारे दिला होता. दरम्यान, या सराफास भागीदार असल्याचे महिलांनी तक्रार अर्जात नमूद केल्याने निरीक्षक के. डी. काटकर यांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.