आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्यकुमार, श्रृती, चारुमेघना ‘सीबीएसई’मध्ये शहरात टॉपर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नवी दिल्ली येथील सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) मार्च-एप्रिल २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल रविवारी (दि. २८) ऑनलाइन जाहीर करण्यात आला. नाशिकमधील सीबीएसई बोर्ड संलग्न शाळांनी यावर्षीही उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. 
 
या परीक्षेचा निकाल जाहीर होण्यास यंदा विलंब झाल्याने विद्यार्थ्यांचे निकालाकडे लक्ष लागून होते. निकालाची टक्केवारी यंदा काहीशी घटली अाहे. गेल्या वर्षी ८३.०५ टक्के निकाल लागला होता. यंदाचा ८२ टक्के आहे. देशभरात ११ लाख विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यात सहा लाख ४० हजार मुले, तर चार लाख ६० हजार मुली होत्या. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.५० टक्के, तर मुलांचे प्रमाण ७८ टक्के आहे. 

बोर्डाच्या cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करून देण्यात आला असून नाशिकमधील सिम्बॉयसिस स्कूल, नाशिकरोड, देवळाली आणि आर्टिलरी सेंटर येथील केंद्रीय विद्यालये किशोर सूर्यवंशी स्कूल या शाळांनी यंदाही निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे. 

‘सिम्बॉयसिस’मध्येचारुमेघना सामंतुला प्रथम : सिम्बॉयसिसस्कूलमधील १४ विद्यार्थी प्रविष्ट होते. स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. चारुमेघना सामंतुला ९३.६ टक्के गुण मिळवून प्रथम अाली. पार्थ भावेजाने ९२ टक्के दीक्षा चांदने ९१ गुण िमळवत अनुक्रमे द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला. स्कूलचा निकाला गेल्या वर्षीही १०० टक्के लागला होता. विद्यार्थ्यांना संस्थेचे समन्वयक डॉ. सी. आर. पाटील, प्रिन्सिपल एस. सबरवाल यांचे मार्गदर्शन लाभले. 
आर्टिलरीकेंद्रीय विद्यालयात श्रृती मिश्रा टॉपर : आर्टिलरीसेेंटर येथील केंद्रीय विद्यालयाचा बारावीचा निकाल ९२ टक्के लागला आहे. ७१ पैकी ६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. श्रृती मिश्राने ९५.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. फौजियाने ९०, तर सचिन चौधरीने ८८ टक्के गुण मिळवून द्वितीय तृतीय क्रमांकाचे यश मिळवले. 

देवळाली केंद्रीय विद्यालयाचा ९१ टक्के निकाल : देवळालीयेथील केेंद्रीय विद्यालय (एक) या स्कूलचा निकाल ९१.८ टक्के लागला. ८६ पैकी ७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच, किशोर सूर्यवंशी स्कूलमध्ये तेजस आहेरने प्रथम क्रमांक मिळवला. स्कूलचे चारही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 
 
शहरात केंद्रीय विद्यालयाचा आदित्य कुमार प्रथम 
नेहरूनगर येथील केंद्रीय विद्यालयाचा विज्ञान शाखेचा आदित्य कुमार ९५.८० टक्के गुण मिळवून शहरात प्रथम अाला. प्रीतेश जाडे ९२.८०, तर साधना पाटील ९१ टक्के गुण िमळवून द्वितीय तृतीय स्थानावर अाले. वाणिज्य शाखेत सुनिधी भुताराने ८९.६०, उपासना पवार ८२.२० अलका चौधरी ७९.४० टक्के गुण मिळवून प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांकावर अाल्या. 
बातम्या आणखी आहेत...