आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन सीबीएसवर २४ सीसी कॅमेऱ्यांद्वारे निगराणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पोलिस कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर नवीन सीबीएस (ठक्कर बझार) परिसरात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बसस्थानक परिसरात बसविण्यात आलेले २१ सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ण सक्षमतेने कार्यान्वित करण्यात आले आहेत. याबरोबरच बसस्थानक परिसराची चकाचक स्वच्छता करण्यात आली असून, बसचालकांना शिस्तीचे पालन करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
शहरातील प्रमुख बसस्थानक असलेले नवीन सीबीएस अर्थात ठक्कर बझार बसस्थानकातून दरराेज ४५० लांबपल्ल्याच्या बसची ये-जा सुरू असते. त्यामुळे स्थानकात दिवसभरात हजाराे प्रवाशांची वर्दळ असते. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी बसस्थानक परिसरात टवाळखोरांकडून पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण करण्याची घटना घडली होती. यामुळे या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रणासाठी ठक्कर बसस्थानक परिसरात २१ सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत.
ठक्कर बझार बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले अाहे.

सुरक्षिततेला प्राधान्य
^बसने प्रवास करणारे प्रवासी हेच अामचे दैवत अाहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे अामचे कर्तव्य अाहे. यासाठी बसस्थानक परिसरात २१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच, बसस्थानक परिसरातील स्वच्छतेवरही भर दिला जातआहे. - एन. एच. जाधव, बसस्थानक नियंत्रक
बातम्या आणखी आहेत...