आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यावसायिकांसह धार्मिक संस्थांची सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यास संमती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील वाढत्या गुन्हेगारीला अाळा घालण्यासाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार अाहेत. पोलिस प्रशासनाकडून शहरात लावण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यांची संख्या अपुरी पडणार असल्याने शहरातील हॉटेल, बँक, उद्योग, शाळा, महाविद्यालय आणि मंदिर, मशीद या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना सीसीटीव्हीचे महत्त्व पटवून देत सर्वांनी शहराच्या आणि अापल्या मालमत्तेच्या रक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी केले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही लावण्यास संमती देत तत्काळ कार्यवाही करण्याचे अाश्वासन दिले.
शहरातील ठरावीक ठिकाणे, रस्ते, चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार अाहेत. मात्र, शहरातील शाळा, महाविद्यालय, हॉटेल, बँक, मंदिर, मशीद या ठिकाणी सीसीटीव्ही लावल्यास पोलिसांना तपास करण्यास सोपे जाणार आहे. फक्त औपचारिक सीसीटीव्ही कॅमेरे लावता त्यांचे चित्रीकरण दर्जेदार असावे, साठवणूक क्षमता अधिक असावी आदी तांत्रिक माहिती या व्यावसायिकांसह व्यवस्थापकांना देण्यात आली.

यावेळी बैठकीतील सर्वांनी सीसीटीव्ही लावण्यास होकार दर्शवत पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. शहराच्या आणि आपल्या सुरक्षेसाठी दर्जेदार सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन पोलिस आयुक्त सिंघल यांनी केले. पोलिस आयुक्तालयातील या बैठकीस विविध क्षेत्रातील शहरातील १०० ते १५० मान्यवर उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...