आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसवर सीसीटीव्ही होणार कार्यान्वित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - बेशिस्त वाहतूक आणि गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी दोन वर्षांपूर्वी दक्षता अभियानाच्या वतीने सीबीएस येथे बसविण्यात आलेला व बंद असलेला सीसीटीव्ही कॅमेरा कार्यान्वित करण्याची मागणी अभियानाकडून करण्यात आली. त्यावर पोलिस आयुक्तांनी तांत्रिक तपासणी करून हा लवकरात लवकर कॅमेरा कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले.
दक्षता अभियानाचे अध्यक्ष तथा माजी महापौर प्रकाश मते यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकार्‍यांनी पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांची भेट घेतली. उद्घाटनानंतर एक महिन्यातच हे कॅमेरे बंद पडले असून, ते पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. पुणे बॉँबस्फोटाच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे असून, लवकरच त्याची तांत्रिक तपासणी करून कॅमेरे कार्यान्वित करणार असल्याचे आश्वासन सरंगल यांनी दिले. या प्रसंगी उपआयुक्त संदीप दिवाण, कार्याध्यक्ष शशिकांत टर्ले, अमृता पवार, तुषार ठाकरे, संजय बोडके, प्रा. सोपान एरंडे, प्रताप देशमुख आदी उपस्थित होते.